सोशल मीडियावर हिरो, मतपेटीत झिरो! निर्मला नवले यांचा 300 मतांनी पराभव

Nirmala Navale Instagram Reels Election Result: महागड्या गांड्यासोबत फोटो आणि व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर तुफान व्हायरल असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव झालाय....कोण आणि कोणत्या पक्षाच्या आहेत या निर्मला नवले ? त्यांच्या पराभवाचीही एवढी चर्चा का रंगलीय..
Former Sarpanch and social media influencer Nirmala Navale after her narrow defeat in the Shrirur Panchayat Samiti elections.
Former Sarpanch and social media influencer Nirmala Navale after her narrow defeat in the Shrirur Panchayat Samiti elections.Saam Tv
Published On

निर्मला शुभम नवले... इंस्टावर 5 लाख 74 हजार फॉलोअर्स... फेसबूकवर 20 हजार फॉलोअर्स.... सोशल मीडियावर जाम हावा (रिल्सचा मोंटाज करा ).... पण निवडणुकीत पडली फकस्त 6,500 मतं अन् परावभव झाला 300 मतांनी... तसं बघितलं तर सोशल मीडियावर लय हिरो... पण निवडणुकीत ठरल्या बीग झिरो.

इंस्टाग्राम म्हणू नका नायतर फेसबूक म्हणू नका... सगळीकडं निर्मला वहिनीच्या रिल्स व्हायरल... माग पिच्छरची गाणी अन् पुढं कामचा धुमधडाका..असल्या व्हिडिओ मुळं वहिनीची ओळख झाली शेलिब्रिटी सरपंच म्हणून... मग वहिनीनं ठरवलं जरा मोठ्या पदावर जावू... म्हणून लढवली पंचायत समिती निवडणूक... शिरुर पंचायत समितीच्या कोरेगाव कान्हूर मेसाई गणतानं निर्मला ताई उभ्या... फॉलोअर्स बघता विजय फिक्सचं असा दिला अनेकांनी कौल... पण झालं उलट ..

वहिनीला भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी दिली जोरादार फाईट अन् वातावरण केलं एकदम टाईट. मतमोजनी संपता संपता हरकलेला चेहरा हिरमुसला. अन् वहिनीचा 300 मतांनी झाला दारुन पराभव असो ही हाय राजकारण. दिसतं तसं नसतं म्हणू जग फसतं ही खरं हाय... यंदा नाय पुढच्या निवडणुकीत विजय होईल ही अपेक्षा... पण एक गोष्ट खरं हाय सोशल मीडियाचं जग अन् सत्यातलं जग यात मोठा फरक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com