Smart Meter
Smart MeterSaam Digital

Smart Meter : नको स्मार्ट मीटर, नको आर्थिक भार: स्मार्ट मीटर विरोधात ग्राहक छेडणार आंदोलन

MSEB News : महावितरणने राज्यातील तब्बल सवा दोन कोटी ग्राहकांच्या घरी, व्यवसायाच्या ठिकाणी स्मार्ट वीज मीटर बसवण्यास सुरूवात केली आहे. त्याचा हजारो कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
Published on

महावितरणने राज्यातील तब्बल सवा दोन कोटी ग्राहकांच्या घरी, व्यवसायाच्या ठिकाणी स्मार्ट वीज मीटर बसवण्यास सुरूवात केली आहे. त्याचा हजारो कोटी रुपयांचा भार पडणार आहे. त्यामुळे नको तो स्मार्ट मीटर आणि नको तो अर्थिक भार अशी भूमिका वीज ग्राहकांनी घेतली असून महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

राज्यात खासगी कंपन्यांच्या माध्यमातून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितला सुमारे २७ हजार कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. यापैकी सुमारे ६० टक्के रक्कम केंद्र सरकार अनुदान रूपाने देणार आहे. तर उर्वरित ४० टक्के म्हणजे जवळापास ११ हजार केटी रूपये रक्कम महावितरणला कर्जरूपाने उभारावे लागणार आहेत. त्याचा भार भार वीज दरवाढीच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांवर पडणार आहे.

Smart Meter
Wardha Bus Fire : वर्धा जिल्ह्यात ट्रॅव्हल्स जळून खाक; बसमध्ये होते १७ प्रवाशी

त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या दृष्टीने कोणताही उपयोग नसलेल्या या स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती करता कामा नये, यासाठी राज्यातील जागरूक वीज ग्राहक, या क्षेत्रातील जाणकार कार्यकर्ते व ग्राहक प्रतिनिधी, सर्व वीजग्राहक संघटना, सर्व औद्योगिक व समाजसेवी संघटना आणि सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते या सर्वांनी या प्रीपेड मीटर सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी स्पष्ट केले आहे.

Smart Meter
Pune Porsche Car Accident : अजित पवारांची नार्को टेस्ट करा'; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरून दमानियांनी अजितदादांना घेरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com