Walmik Karad : पुणे, परळीत रो हाऊस, बंगला, लाखोंची शेतजमीन; वाल्मीक कराडची कोट्यवधींची संपत्ती होणार जप्त

Walmik Karad Latest News : आरोपी वाल्मीक कराडची कोट्यवधींची संपत्ती जप्त होणार आहे. एसआयटीकडून मोठ्या पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत.
Santosh Deshmukh Case Walmik Karad
Santosh Deshmukh Case Walmik KaradSaam Tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडची संपूर्ण संपत्ती जप्त होण्याच्या मार्गावर आहे. कराडची संपत्ती करण्यासाठी एसआयटीकडून कोर्टामध्ये अर्ज करण्यात आला आहे. वाल्मीक कराडची राज्यभर असलेल्या कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीकडून मोठ्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची संपत्ती राज्याने राज्याच्या बाहेर देखील आहे. आरोपी वाल्मीक कराड याच्यासहित पत्नी मंजिली कराड, दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि मुलगा गणेश अशा तिघांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती आहे. वाल्मीक कराडने २०२० ते २०२४ साली सर्व संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलं आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला असून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी न्यायालयामध्ये अर् करण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Case Walmik Karad
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; कराडला गोत्यात आणणारा मोठा पुरावा सापडला, VIDEO

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने कोट्यवधी रुपयांची जमवलेली संपत्ती त्याच्या एका चुकीमुळे त्याला गमवायची वेळ आली आहे. राज्य आणि राज्याच्या बाहेर वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. आता त्याला संपत्ती गमवावी लागणार आहे. वाल्मीक कराडने प्लॉट, रो हाऊस, कोट्यवधी रुपयांची जमीन नेमकी कोणत्या उद्योगांमधून कमवली, याची देखील चौकशी होणार आहे. वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीने आता बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज केला आहे.

Santosh Deshmukh Case Walmik Karad
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, मोकारपंती ग्रुपवर दाखवले छळाचे लाइव्ह व्हिडीओ

वाल्मीक कराडची संपत्ती किती?

आरोपी वाल्मीक कराडची पुणे, लातूर, परळी, केज इतर ठिकाणी हायफाय रो हाऊस

1) केज मध्ये 2500 चौरस फुटांचा प्लॉट आणि एक बंगला किंमत 1 कोटी 69 लाख रुपये.

2) बीडच्या दगडवाडी मध्ये शेत जमीन किंमत 48 लाख 26 हजार रुपये.

3) मौजे तडोळी येथे 12 एकर शेत जमीन 20 लाख 27 हजार रुपये.

4) परळी रोडवर अंबाजोगाई 380 चौ. मी. बांधकाम

5) अंबाजोगाई मध्येच 419 चौ.मी बांधकाम किंमत कोट्यावधी रुपये.

6) याच वाल्मीक कराडचे बीडच्या दगडवाडी स्टोन क्रेशर युनिट

7) दगडवाडी गावात 48 लाखांची शेत जमीन

8) परळीतील वडगावात साडेचार एकर शेत जमीन किंमत 13 लाख रुपये.

9) वडगावातच आणखी एक प्लॉट किंमत दीड लाख रुपये.

10) बीडच्या सिरसाळा गावात 581 चौ.मी खुला प्लॉट किंमत साडेसात लाख रुपये

Santosh Deshmukh Case Walmik Karad
Pune Crime: केक कापताना दाखवली पिस्तूल नंतर... पोलिसांना पाहून गुंडाने ठोकली धूम

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. इतकी संपत्ती वाल्मीक कराड कडे कुठून आली आणि त्याचा उद्योग तरी काय आहे, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. वाल्मीक कराडसह पत्नी मंजिली कराड, ज्योती जाधव आणि मुलगा गणेश कराडच्या नावे आहे. मात्र या संपत्तीवर आता टाच येणार आहे. एसआयटीकडून वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी राज्य आणि राज्याच्या बाहेर असलेली संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. आता वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com