Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

Trimbakeshwar Temple: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरानंतर आता पुण्यातील भिमाशंकर मंदिरात पाणी गळती होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मंदिरांमध्ये गळती होत आहे. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात मोठी गर्दी झाली असून भाविकांचे हाल होत आहे.
Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO
Bhimashankar TempleSaam Tv
Published On

Summary -

  • भिमाशंकर मंदिरात मुसळधार पावसामुळे सभामंडपात पाणी गळती

  • पहिल्या श्रावण सोमवारमुळे मंदिरात मोठी गर्दी झाली असून भाविकांचे हाल

  • त्र्यंबकेश्वर मंदिरातही पावसामुळे गळती कायम

  • पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप

रोहिदास गाडगे/ अजय सोनावणे, साम टीव्ही

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरानंतर आता पुणे जिल्ह्यातल्या भिमाशंकर मंदिराला देखील गळती लागली आहे. भिमाशंकर परिसरात गेल्या २४ तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात भाविकांसाठी मंदिर म्हणजे एकमेव आश्रयस्थान आहे. मात्र मंदिराच्या सभामंडपात पाणी गळती होत असल्याने शेकडो भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.

भिमाशंकर मंदिराच्या सभामंडपाच्या छतावरून थेट मंडपात पाणी झिरपत असून भाविक भिजत दर्शन घेत आहेत. यासाठी जबाबदारी थेट पुरातन विभागावर येते. पावसाचा अंदाज असूनही वेळेत डागडुजी न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मंदिर व्यवस्थापन आणि पुरातन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पावसात चिंब झालेल्या भाविकांना या गळतीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO
Shravan Recipe: श्रावणात नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत बटाट्याचे काप, फक्त १० मिनिटांत

१२ ज्योतिर्लिंगांमध्ये भिमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर हे मंदिर येतात. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातही गेल्या काही दिवसांपासून गळती सुरू आहे. मंदिराला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मंदिराला गळती लागली आहे. चोल आणि नागरी शैलीतील या मंदिराचा १७५४ साली माधवराव पेशवे यांनी जीर्णोद्धार केला होता.

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO
Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी एकीकडे भाविकांची मोठी गर्दी होत असते तर दुसरीकडे मंदिराला लागलेली गळती कायम असल्यामुळे भाविकांचे हाल होत आहे. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिराची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देवस्थान आणि विश्वस्तांकडून पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. पुरातत्व विभागाकडून मात्र पाठपुरावा करूनही मंदिराची दुरुस्ती करण्यात आली नाही.

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO
Shravan Somwar 2025: पहिल्याच श्रावणी सोमवारी बनलेत 4 दुर्मिळ योग; 3 राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

त्र्यंबकेश्वर मंदिराचा गाभारा आणि सभामंडपात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. सभा मंडपात होणाऱ्या गळतीमुळे भाविकांची गैरसोय होत आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर भाविक या गळतीमुळे भिजत आहेत. तर गाभाऱ्यात देखील गळती होत आहे. या गळतीमुळे मंदिरालाही धोका निर्माण झाला आहे. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO
Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com