Shravan Somwar 2025: पहिल्याच श्रावणी सोमवारी बनलेत 4 दुर्मिळ योग; 3 राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Astrology Panchang Yog 28 July 2025: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित असतो आणि श्रावण सोमवारी शिवभक्त विशेष पूजा-अर्चा करतात.
Shravan Somwar 2025
Shravan Somwar 2025saam tv
Published On
Summary
  • 28 जुलै रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे, जो शिवपूजनासाठी अत्यंत शुभ आहे.

  • या दिवशी विनायक चतुर्थी, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि रवियोग एकत्र येत आहेत.

  • चंद्र आणि मंगळ यांची कन्या राशीत युती महालक्ष्मी राजयोग तयार करत आहे.

28 जुलै म्हणजेच आज पहिला श्रावणी सोमवार आहे. हिंदू धर्मात श्रावणी सोमवारचा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांची विशेष आराधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी उपवास, व्रत आणि पूजन केल्याने भक्तांना विशेष फळ मिळतं, अशी मान्यता आहे. पहिल्याच श्रावणी सोमवारी अनेक खास योग जुळून आले आहेत.

Shravan Somwar 2025
Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

पंचांगानुसार पहिल्या श्रावणी सोमवारी अनेक दुर्मिळ योगांचा संयोग घडतोय. ज्यामुळे हा दिवस अधिक शुभ, फलदायी आणि सकारात्मक ठरेल.

कोणकोणते योग तयार होत आहेत?

  • विनायक चतुर्थीचा संयोग – म्हणजेच गणपतीबाप्पाची कृपा मिळवण्याचा योग

  • पूर्वा फाल्गुनी नक्षत्र – हे नक्षत्र सौंदर्य, समृद्धी आणि सुखसमाधानाचं प्रतीक मानलं जातं

  • रवियोग – अशुभ गोष्टींचा नाश करणारा शुभ काळ

  • चंद्र- मंगळ युती कन्या राशीत – ज्यामुळे बनतोय महालक्ष्मी राजयोग

Shravan Somwar 2025
Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

काय आहे खास?

२८ जुलैच्या रात्री ११:५९ वाजता चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान याच दिवशी मंगळ ग्रह देखील कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या दोघांचं एकत्र आगमन‘महालक्ष्मी राजयोग’ बनवणार आहे. ज्योतिष शास्त्रात या योगाला आकस्मिक धनलाभ, प्रतिष्ठा, सौख्य आणि आर्थिक स्थैर्य देणारा अत्यंत शुभ योग मानलं जातं. यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मेष रास (Aries)

मंगल आणि चंद्राच्या युतीने मेष राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात उत्तम यश मिळणार आहे. ज्यांचं काम अडकलं होतं, त्यात प्रगती होणार आहे. वरिष्ठांची प्रशंसा आणि मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. घरामध्ये नवीन आनंददायक घटना घडणार आहेत.

Shravan Somwar 2025
Dashank Yog: 50 वर्षांनंतर बनणार दशांक योग; 'या' राशींचं नशीब चमकणार, मिळणार पैसा

कर्क रास (Cancer)

या राशीसाठी हा योग आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी वरदान ठरणार आहे. या काळात तुमची पैशांची अडचण दूर होणार आहे. त्याचप्रमाणे अचानक नवीन कमाईचं साधन मिळू शकतं. नोकरी बदलण्याची किंवा नवीन नोकरी सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा सोमवार अत्यंत शुभ आहे. व्यवसायात मोठा लाभ, नवीन व्यवहार किंवा नवीन पार्टनरशिप होण्याचे संकेत आहेत. या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ किंवा कोणतीतरी महत्त्वाची डील फायनल होऊ शकते. परदेशात जाण्याचं तुमचं स्वप्न अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Q

28 जुलैचा श्रावणी सोमवार का महत्त्वाचा आहे?

A

या दिवशी शिवपूजन, विनायक चतुर्थी, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि महालक्ष्मी राजयोग असल्यामुळे तो अत्यंत शुभ आहे.

Q

महालक्ष्मी राजयोग कसा तयार होत आहे?

A

चंद्र आणि मंगळ यांची कन्या राशीत युती झाल्यामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे.

Q

मेष राशीच्या लोकांना या योगात कोणता लाभ होईल?

A

मेष राशीला करिअरमध्ये यश, वरिष्ठांची प्रशंसा आणि घरात आनंदाच्या घटना येण्याची शक्यता आहे.

Q

कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग का फायदेशीर आहे?

A

कर्क राशीला पैशाची अडचण दूर होणे, अचानक धनलाभ आणि नोकरीत प्रगती यांचे योग आहेत.

Q

धनु राशीच्या लोकांना या दिवशी काय शुभ संकेत आहेत?

A

धनु राशीला व्यवसायात लाभ, नवीन डील आणि परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com