ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पूर्वीच्या काळात स्त्रीयांना शेतीतील जड कामे, सोबतच स्वयंपाक व घरातील इतर कामेही करावी लागत असत. यामुळे आधीच शरीर थकलेले असताना उपवास करणे टाळले जायचे.
मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रियांना अशक्तपणा येतो. यामुळे त्यांच्या शरीराला पुरेसे पोषण मिळाले नाही तर, इतर आजारही उद्भवू शकतात.
मासिक पाळीत स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. यामुळे त्यांना सारखे चमचमीत पदार्थ खावेसे वाटत असतात.
घर्भाशयातून रक्तस्त्राव होत असतो. लोह आणि ऊर्जेची कमी भासते. यामुळे शरीर थकलेले असते.
या दिवसांत मोठ्या प्रमाणात पोटदुखी होते. हार्मोनल बदलांमुळे मूड स्विंग्स होतात. सतत चिडचिड होत असते.
मासिक पाळी सुरू असताना उपवास केला तर, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते व थकवा येतो. यामुळे चक्कर येऊ शकते, डोके दुखीही होऊ शकते.
गर्भाशयाला योग्य पोषण मिळाले नाही तर, पोटदुखी वाढू शकते. उपाशी राहिल्याने अॅसिडीटी होण्याचीही शक्यता असते.
मूड स्विंग्समुळे मन शांत नसते. पूजा करताना लक्ष केंद्रित करता येत नाही. म्हणून मासिक पाळीत शक्यतो उपवास करणे टाळा. करायचा असल्यास योग्य आणि पोषक आहार घ्या.
श्रावणात सुख-समृद्धीसाठी उपवास करा असे म्हणतात. पण उपवास करणे आवश्यकच आहे असे नाही. मनात देवाबद्दल निस्वार्थ भाव ठेवा आणि निस्सीम भक्ती करा.