
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांंचं वादग्रस्त विधान
मटण पार्टीवर टीका करणाऱ्या मंत्री जयकुमार गोरे यांना जानकर यांनी खोचक प्रत्युत्तर
जानकरांच्या विधानामुळे वन्यजीव प्रेमींतून तीव्र संताप व्यक्त
नीरा देवघर धरणातून पाणी मिळावे या मागणीसाठी आंदोलन झाल्यानंतर हा वाद निर्माण झालाय
सोलापूर : आमची लोक पूर्वी वाघाची शिकार करायची. आता ताणून ससा धरुन खाणारी माणसं आहेत, असे धक्कादायक आणि वादग्रस्त वक्तव्य माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलं आहे. उत्तम जानकर यांच्या वक्तव्यामुळे या भागातील वन्यजीव प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, या विधानामुळे आमदार जानकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नीरा देवघर धरणातून पाणी मिळावे, या मागणीसाठी काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन झालं. आंदोलनानंतर मटण पार्टी झाली होती. या मटण पार्टीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली होती. जयकुमार गोरे यांच्या टीकेला आता आमदार उत्तम जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आमदार उत्तम जानकर यांनी टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, 'वडापाव,केळी खाऊन लोक कंटाळले आहेत. त्यामुळे आता बोकड, ससा खात असतील, तर बिघडले कुठं? या भागातील माणसं ही डोंगरदऱ्यात राहतात. संताजी घोरपडे यांच्या सोबतच्या लढाईत या भागातील लोक होते. पूर्वी हे लोक वाघाची शिकार करायची आता सरकारबरोबर लढाई करायची म्हणून ते बोकडं खात असतील बिघडले कुठे'.
'दुष्काळाचा प्रश्न सोडवला तर लोक बोकडं खाणार नाहीत. केळी, भोपळा, वडा पाव खातील, असा खोचक टोलाही त्यांनी पालकमंत्र्यांना लगावला. 'आम्ही काहीही खाऊ. परंतु आता प्रश्न ज्वलंत आहे. तो प्रश्न सरकारने सोडवून दुष्काळी भागाला पाणी द्यावे, अशी मागणीही आमदार जानकर यांनी केली. आमदार उत्तम जानकर यांच्या टीकेला आता मंत्री जयकुमार गोरे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.