Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक घटना! अंगणवाडीच्या पोषण आहारात बंद पॅकेटमध्ये आढळला मृत पक्षी; पालकांचा संताप

Nashik News : नाशिकमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप.
DEAD BIRD FOUND IN ANGANWADI NUTRITION FOOD PACKET IN DEVGAON NIPHAD | NASHIK NEWS
DEAD BIRD FOUND IN ANGANWADI NUTRITION FOOD PACKET IN DEVGAON NIPHAD | NASHIK NEWSSaam tv
Published On
Summary
  • नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव येथे धक्कदायक प्रकार

  • अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत पक्षी आढळला

  • पालकांमध्ये संतापाचे वातावरण

अजय सोनावणे, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव येथे अंगणवाडीतील पोषण आहाराबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंगणवाडीतील मुलांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी आढळला आणि एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील देवगाव बिट क्रमांक दोनमधील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून नियमितप्रमाणे लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. संबंधित कुटुंबाने हे पाकीट घरी नेल्यानंतर ते उघडताना त्यामध्ये मृत पक्षी असल्याचे निदर्शनास आले. पक्षी कुजलेल्या अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला असून, हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली.

DEAD BIRD FOUND IN ANGANWADI NUTRITION FOOD PACKET IN DEVGAON NIPHAD | NASHIK NEWS
New Bride Ritual : आषाढ महिन्यात नवविवाहितेला माहेरी का पाठवतात? काय आहे परंपरा

या घटनेमुळे अंगणवाडीतून वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या योजनेत अशा प्रकारची निष्काळजीपणा आढळणे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच पोषण आहाराच्या उत्पादन, पॅकिंग आणि वितरण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

DEAD BIRD FOUND IN ANGANWADI NUTRITION FOOD PACKET IN DEVGAON NIPHAD | NASHIK NEWS
Hair Care Tips : केसांचे गळणे होईल कायमचे बंद! मेथी दाण्यांमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून लावा; एका आठवड्यात दिसेल जादू

दरम्यान, संबंधित प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. तपासानंतर नेमके तथ्य समोर येणार असले तरी या घटनेमुळे अंगणवाडी लाभार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com