गुरुजीच झाले 'कॉपी बहाद्दर',12 वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी

Mass Copying Hsc Exam Aurangabad Cctv Scam: बारावीच्या पहिल्याच इंग्रजी पेपरला बोर्डानं लावलेल्या सीसीटीव्ही समोर बसूनच सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलाय...मात्र ही सामूहिक कॉपी विद्यार्थ्यांनी कशी केली? कॉपीमुक्त महाराष्ट्र या अभियानाचा कसा बोजवारा उडालाय...
Teachers and students caught in mass copying during the Class 12 English exam under CCTV surveillance in Maharashtra
Teachers and students caught in mass copying during the Class 12 English exam under CCTV surveillance in MaharashtraSaam Tv
Published On

बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट! ही परीक्षा पारदर्शक व्हावी म्हणून शिक्षण मंडळ कोट्यवधी रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावतं, भरारी पथकं तैनात करतं. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडलंय, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. जिथे सीसीटीव्ही बसवले होते, त्याच कॅमेऱ्यासमोर चक्क शिक्षकांच्या उपस्थितीत 'सामूहिक कॉपी'चा महासोहळा पार पडलाय... ज्या शिक्षकांनी शिस्त लावत मुलांकडून पेपर लिहून घ्यायचे तेच शिक्षक मुलांना कॉपीसाठी मदत करत होते.

कन्नड तालुक्यातील जैतापूरमधल्या एका परिक्षा केंद्रावर 327 विद्यार्थी परीक्षा देत होते. इथे जेव्हा भरारी पथक पोहोचलं तेव्हा त्यांना काय आढळलं पाहा...पर्यवेक्षकांसह इतर शिक्षक, कर्मचारीच परीक्षार्थीना इंग्रजीच्या पेपरसाठी उत्तरं पुरवत होते. अनेक विद्यार्थी एकाच बेचवर बसून सामूहिक उत्तरं लिहीत होते. एवढंच नाही तर परीक्षा केंद्रावर एकसारखी उत्तरं असणारी उत्तरपत्रिका सापडल्या. दरम्यान याप्रकरणी केंद्रातील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.केंद्रावरचे विद्यार्थी,शिक्षक, केंद्रप्रमुख सगळेच या मास कॉपी प्रकरणात सामील झालेले... या 19 कर्मचाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आलीय...

बीडच्या चौसाळातही शिक्षक आणि केंद्रप्रमुख विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा ड्रोन व्हिडिओ समोर आला होता... गेल्या काही वर्षांपासून बारावी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून विभागीय आणि राज्य मंडळ प्रयत्नशील आहे. कॉपी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही लावलेले असले तरीही परीक्षार्थी, शाळेच्या केंद्रावरील केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनाच धाक उरलेला नाही.. कॉपी बहाद्दर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे कष्ट मात्र वाया जातात.... त्यामुळे आता कॉपीमुक्तीसाठी शासनाने अजून कठोर उपाययोजना करून अशा विदयार्थ्यांना आणि शिक्षकांनाही कडक कारवाई करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com