Solapur Crime: नवऱ्याचं डोकं सटकलं; चार्जरच्या वायरने बायकोचा गळा आवळला, नंतर स्वत:लाही संपवलं

Shocking Double Death in Solapur: सोलापूर जिल्ह्यातील उळे गावात पती-पत्नीमधील वादातून दुहेरी मृत्यू. पतीने चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. पोलिसांचा तपास सुरू.
HUSBAND KILLS WIFE, THEN HANGS HIMSELF IN SOLAPUR
HUSBAND KILLS WIFE, THEN HANGS HIMSELF IN SOLAPURSaam TV News
Published On

कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने बायकोचा गळा आवळला. नंतर नवऱ्यानेही गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात घडली असून, या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

गोपाळ लक्ष्मण गुंड (वय वर्ष ३०) असे पतीचे, तर गायत्री गोपाळ गुंड (वय वर्ष २२) असे पत्नीचे नाव आहे. हे जोडपं दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातील रहिवासी होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा प्रेम विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर त्यांच्यात वाद सुरू होते. क्षुल्लक कारणावरून दोघेही एकमेकांशी भांडायचे.

HUSBAND KILLS WIFE, THEN HANGS HIMSELF IN SOLAPUR
Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

घटनेच्या दिवशी गोपाळला राग अनावर झाला. त्यानं थेट चार्जरची वायर घेतली आणि बायकोचा गळा आवळला. यामुळे बायकोचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पतीने घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं. याची माहिती गावकऱ्यांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच जवळच्या रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, ही घटना नेमकी कशामुळे घडली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या ह्रदयद्रावक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

HUSBAND KILLS WIFE, THEN HANGS HIMSELF IN SOLAPUR
Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com