Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

Tragedy in Pandharpur: पंढरपूरच्या कासेगावमध्ये घरगुती वादातून एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली. आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेतली, तर दुसऱ्या दिवशी वडिलांनी गळफास घेतला.
Four Family Members End Lives Over Domestic Dispute
Four Family Members End Lives Over Domestic DisputeSaam TV News
Published On

पंढरपुरातून एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून आसबे कुटुंबीयांनी टोकाचं पाऊल उचललं. आधी पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नंतर पतीने घरात गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगावात ही धक्कादायक घटना घडली. ४ जुलै रोजी पत्नी मोनाली म्हमाजी आसबे आणि पती म्हमाजी आसबे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. वाद टोकाला गेला. यानंतर पत्नीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी मोनाली म्हमाजी आसबे आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह गावातील विहिरीजवळ गेल्या.

Four Family Members End Lives Over Domestic Dispute
Shocking: सूनेची क्रूरता! आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

नंतर मोनालीने आपल्या मुलांसह आत्महत्या केली. पत्नी आणि मुलांनी आत्महत्या केल्यामुळे पतीला मानसिक धक्का बसला. त्यानं ५ जुलै रोजी सकाळी गळफास घेत स्वतःला संपवलं. या घटनेने एकाच घरातील चार जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. राग आणि वादामुळे एका कुटुंबाचा अंत झाला.

या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव हादरलं आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Four Family Members End Lives Over Domestic Dispute
Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन घेतल्यानंतर ३४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज रांजणगाव येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय धनंजय आत्माराम पडघम या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्याआधी धनंजयने पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेतले होते. त्याचा व्हिडीओ त्याने शूट करून सोशल मीडियावरही शेअर केला होता. मात्र, रात्रीच त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com