Yavatmal: नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात सिलिंडर घातला; चारित्र्याच्या संशयावरून निर्घृण हत्या

Wife dies on spot after cylinder attack: यवतमाळमध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घालून हत्या केली. कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावर संशयातून संतप्त पतीने पत्नीचा जागीच खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Shocking Crime in Yavatmal
Shocking Crime in YavatmalSaam TV News
Published On

पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना यवतमाळमधून उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. डोक्यात सिलिंडर घालून आरोपीने पत्नीची हत्या केली. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

इंद्रकला विजय जयस्वाल असे मृत महिलेचं नाव आहे. तर, विजय जयस्वाल असे मारेकरी पतीचे नाव आहे. दोघेही यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरातील रहिवासी. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, असा संशय त्याला होता. यामुळे दोघांमध्ये सतत भांडणं होत.

Shocking Crime in Yavatmal
नशीबवान! पहिल्याच दिवशी मजुराचं नशीब चमकलं, खोदकाम करताना सापडला लाख मोलाचा हिरा; रातोरात झाला लखपती

घटनेच्या दिवशी वाद विकोपाला गेला. संतप्त पतीने स्वयंपाक घरातील सिलिंडर उचलला आणि पत्नीच्या डोक्याक घातला. या हल्ल्यात इंद्रकला जागेवरच कोसळली. प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे इंद्रकलाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती शेजारी राहणाऱ्या लोकांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Shocking Crime in Yavatmal
Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तसेच मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. नंतर तपास करून आरोपी पतीला ताब्यात घेतलं. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com