Beed Sarpanch: 'तू कोण रे कुत्र्या'; जातीवाचक शिवीगाळ अन् धमकी, देशमुख प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Shocking Beed news: बीडच्या मस्साजोग प्रकरणात वाल्मिक कराड याचा जातीवाचक शिवीगाळ करतानाचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. दहा लाखांच्या वादातून धमकी दिल्याचा आरोप; प्रकरणामुळे संताप व्यक्त.
Beed Sarpanch Murder Case
Beed Sarpanch Murder CaseSaam Tv
Published On

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड तुरूंगात असून, कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमधून कराड तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं आहे.

वाल्मिक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचे गुन्हे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान, वाल्मिक कराडचा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. या रेकॉर्डिंगमध्ये पैशांच्या व्यवहारातून कराड तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करत आहे. 'आता सगळ्यांनाच मध्ये घेतो.. तू कोण रे कुत्र्या...' अशा प्रकारे त्याने तरूणाला शिवीगाळ केली आहे.

Beed Sarpanch Murder Case
Raj Thackeray: 'अरे ये!! माझ्याकडे डोळे वटारून काय बघतोस' राज ठाकरे नेमकं कुणाला म्हणाले? ट्रेलर लाँचमध्ये काय घडलं?

गावातील एका व्यक्तीने कामासाठी वाल्मिक कराडला दहा लाख रूपये दिले होते. मात्र, वाल्मिक कराड पुन्हा ते पैसे परत करत नव्हता. पैसे मागितल्यावर टाळाटाळ करत होता. पैसे परत नसल्याने त्याने कराडला फोन केला. संतापून कराडने त्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केली. त्याचाच हा ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

Beed Sarpanch Murder Case
BNP Leader: ३५ हजारांचं कर्ज फेडलं नाही; महिलेला आधी विवस्त्र केलं, नंतर बलात्कार, नेत्याचं महिलेसोबत भयंकर कृत्य

या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात वंजारी नेते विजयसिंह (बाळा) बांगर यांनी सांगितले की, 'एका व्यक्तीने वाल्मीक कराडला कामासाठी दहा लाख रूपये दिले होते. मात्र, महिने उलटून गेले तरी, कराड पैसे परत करत नव्हता. संबंधित व्यक्ती वारंवार कराडकडे पैशांची मागणी करत होता. त्याने वारंवार फोन केले. वाल्मिक कराडने फोनवर त्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केली', अशी माहिती त्यांनी दिली.

Beed Sarpanch Murder Case
Shocking: टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूसोबत वन नाईट स्टँड; ट्रान्स अभिनेत्रीचा शॉकिंग दावा; क्रिडाविश्व हादरलं

शिवीगाळ करून धमक्या दिल्या कारणाने, त्याच्या कुटुंबियांपैकी कुणीही पुढे येऊन तक्रार करण्यास तयार नाही. वाल्मीक कराडचे दहशत जिल्ह्यामध्ये असल्यामुळे कुणीही समोर येत नाही आहे. मात्र, या संदर्भात बीड जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटून कॉल रेकॉर्डिंग देणार असल्याचं बाळा बांगर यांनी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com