सांगली : सांगलीमध्ये (Sangli) माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. नातू आजीला दारूच्या नशेत रोज मारहाण करत होता. त्याचा मारहाण करताना व्हिडीओ (Video) शेजाऱ्यांनी शिवसेनेकडे पाठवला तो व्हिडीओ मिळताच तात्काळ शिवसेनेच्या सुजाता इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शिवसेना (Shivsena) स्टाईलने, आजीला मारहाण करणाऱ्या नातवाला चोप दिला आणि त्या नराधामस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सांगलीच्या (Sangli) माधवनगर कर्नाळ रोडवर हा नाराधम भाड्याच्या घरात राहतो. त्याचे आई-वडील आज्जी आणि तो घरात राहतात. आजीला चालता येत नसल्याने घराबाहेर तिला ठेवण्यात आले आहे. मात्र हा दारूडा दारु पिऊन आला की आज्जीला मारहाण करायचा तसचं शेजारी सोडवण्यासाठी गेले तर त्यांना शिवीगाळ करत होता आणि याच प्रकरणाचा एका शेजाऱ्याने व्हिडीओ केला आणि शिवसेनेच्या महिलांना पाठवला असता त्यांनी त्या नराधम नातवाला चोप दिलाच मात्र पोलिसांच्या हवाली देखील केलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.