मुंबई: देशासह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. त्यामुळे राज्यात याअगोदरच कोरोना निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आली होती. आता त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आता अनेक निर्बंध (Corona Restriction) पुर्णपणे हटवले जाणार आहे. खासकरुन ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीकरण हे ७०%च टक्के झाले आहेत अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध हटवले जाणार आहेत. यात मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, गोंदिया, चंद्रपूर, सांगली, पालघर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांतील 70 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याने तेथील निर्बंध मागे घेण्यात येतील. (Half Maharashtra free from restrictions! Establishment opened at full capacity after Corona in under control)
हे देखील पहा -
राज्यात यापूर्वीच १ फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाटयगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी दोनशे आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरील निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. मात्र अजूनही राज्यात ब्युटी सलून तसेच केश कर्तनालय, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क, उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहांना 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे बंधन आहे. परंतु गेल्या महिनाभरात राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून रविवारी आतापर्यंतची सर्वात कमी अशी 407 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या केवळ 6 हजार 106 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाची (Corona) लाट ओसरल्याने निर्बंध शिथिल करावेत, अशा मार्गदर्शक सुचना केंद्रानं राज्यांना दिल्या होत्या, त्यामुळे आता राज्यातले अनेक निर्बंध रद्द होणार आहेत.
लोकल प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस अनिवार्यच
1 मार्च रोजी तयार केलेली कोरोना निर्बंधांबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यास राज्य सरकारला परवानगी मिळाली आहे. लोकल (Mumbai Local) प्रवासासाठीच्या लससक्ती विरोधातील याचिका निकाली निघाली आहे. यानुसार सध्यातरी लोकल प्रवासासाठी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. या नव्या नियमावलीला कोर्टात आव्हान देण्यास याचिकाकर्त्यांना मुभा देण्यात आली आहे.
Edited By - Aksahay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.