Sanjay Raut News: 'शिवसेनेत रामाचा प्राण; उद्धव साहेब वेट अँड वॉच...' रामायणाचा दाखला देत राऊत भाजपवर बरसले!

Shivsena Thackeray Group Adhivseshan Nashik: नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आलं असून राज्यभरातील शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaamtv

गिरीश कांबळे, नाशिक|ता. २३ जानेवारी २०२४

Sanjay Raut Speech Nashik:

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Birth Anniversary) यांची आज जयंती. हाच मुहूर्त साधत शिवसेना ठाकरे गट लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आलं असून राज्यभरातील शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. या सभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी राममंदिर उद्घाटन सोहळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला तसेच आगामी निवडणुकांची रणनितीही स्पष्ट केली.

काय म्हणाले संजय राऊत?

"फक्त नाशिक नव्हे महाराष्ट नव्हेतर संपूर्ण देशाचं वातावरण हे राममय झालं आहे. त्या वातावरणात उद्धव ठाकरे यांनी या महाशिबिराची ज्योत मशाल पेटवली आहे. प्रभू श्रीरामांशी आमचे जुने नाते आहे. शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा झाली नसती. शिवसैनिकांनी हिंमत दाखवली नसती तर काल पंतप्रधानांना प्राण प्रतिष्ठा करता आली नसती," असे संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

भाजपकडे धैर्य नाही...

"जो राम अयोध्येतला आहे, तोच राम पंचवटीतील आहे. उद्धव ठाकरे यांनी नाशिकची निवड केली त्याला फार महत्व आहे. रामाचे धैर्य आहे ते शिवससेनेचे धैर्य आहे.रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरे यांचा संयम आहे. ते धैर्य आमच्याकडे नसतं तर शिवसैनिकांनी बाबरी पाडली नसती. भाजपकडे धैर्य नाही, बाबरी कोसळली तसं त्यांचं धैर्य कोसळलं आणि आम्ही केलं हे नाही असं सांगितलं," अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut News
Unseasonal Rain: भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत

भाजपमध्ये विष्णुचा तेरावा अवतार...

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. "अयोध्येत जसं श्रीरामाचे जसं स्वागत झालं तसं स्वागत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कल्याण लोकसभेत झालं, तसं या नाशिममध्ये झालं. प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण आहे, आता मला वाटतं दुसऱ्या हातात मशाल येईल. भाजपमध्ये विष्णुचा तेरावा अवतार आलेला आहे. मात्र रामाचे धैर्य आहे ते विष्णू मध्ये नाहीये," असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे?

"तेव्हा एकच रावण होता आता दिल्लीत, राज्यात, नाशिकमध्ये रावणच रावण आहेत. मात्र सध्याचा रावण अजिंक्य नाहीये. रावणाच्या दरबारात कॉन्फिडन्स लूज करण्यासाठी हनुमान गेला होता. आताही विरोधकांचा कॉन्फिडन्स लूज करणे गरजेचे आहे. कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार? कोण एकनाथ शिंदे? कॉन्फिडन्स लूज करा, असेही राऊत पुढे बोलताना म्हणाले. (Latest Marathi News)

Sanjay Raut News
Maratha Survey: शिक्षकांना ओव्हरटाइम करावी लागणार; राज्यात आजपासून मराठा सर्वेक्षणाला सुरूवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com