Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; भाजप किती जागा जिंकणार?, गुरु रामभद्राचार्यांच्या भविष्यवाणीची देशभर चर्चा

Political News : अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात देशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये गुरू रामभद्राचार्य देखील सहभागी झाले होते.
PM Modi
PM ModiSaam Tv

Political News :

देशात आणि राज्यात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी सभा, भेटीगाठी, रॅली अशा पद्धतीने प्रचार सुरु केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक कोण जिंकणार असे अंदाज देखील आता बांधले जावू लागले आहेत. अशात अध्यात्मिक गुरु रामभद्राचार्य यांनी वर्तवलेल्या अंदाजाची जोरदार चर्चा सुरु आहे. (Latest Marathi News)

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात देशातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये गुरू रामभद्राचार्य देखील सहभागी झाले होते. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य भावुक झालेले दिसले. अभिषेक झाल्यानंतर गुरु रामभद्राचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi
Ayodhya Ram Mandir Inauguration : CM एकनाथ शिंदे निमंत्रण असूनही अयोध्येला का गेले नाहीत? स्वत:च सांगितलं कारण...

गुरू रामभद्राचार्य यांनी म्हटलं की,मी सध्या भावुक झालो आहे. प्रभू राम वनवासातून परत येण्याच्या वेळी वशिष्ठजींची जी परिस्थिती होती, तशीच आज माझी स्थिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर गुरु रामभद्राचार्य म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहज जिंकतील. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला आहे. मोदींना आमचा आशीर्वाद आहे, ते सदैव प्रसन्न राहतील.

PM Modi
Ramlala In Foreign Media: परदेशातील मीडियाला कसा वाटला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा; Pak-US मीडियाने कसं केलं कव्हरेज

गुरु रामभद्राचार्य यांनी याआधी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होती अशी भविष्यवाणी केली आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरने डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेमध्ये देखील भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com