Unseasonal Rain: भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत

Unseasonal Rain in Bhandara: मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam TV
Published On

शुभम देशमुख

Bhandara:

भंडारा जिल्ह्यात आज सकाळी हलक्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली मागील २ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच आज सकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Unseasonal Rain
Bhandara : तुमसरमध्ये राजसाेसपणे बेकायदेशीर मुरुमाचे उत्खनन, महसूल विभाग कारवाईचे धाडस दाखविणार का ?

अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर सध्या रब्बी हंगामाच्या भात पिकाची लागवड सुरू आहे. त्यामुळे भात पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे.

राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. अशात राज्यात आज मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरचा पारा घसरला; हवेत धुक्याची चादर

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. वातावरणातील या बदलामुळे मंगळवारी सकाळी कोल्हापूर धुक्यात हरवल्याचे दिसले. दरम्यान, सकाळच्या थंडीमुळे लोक गारठून गेले आहेत. तर काही नागरिकांनी दाट धुक्याचा आनंद लुटला. या धुक्यातून वाहन चालवताना समोरचं स्पष्ट दिसत नसल्याने चालकांना कसरत देखील करावी लागत आहे.

Unseasonal Rain
Weather Report: हवामान बदलामुळे गेल्या 10 वर्षांत भारतात मान्सूनमधील पर्जन्यमानामध्ये ५५ टक्‍के वाढ: CEEW चा अहवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com