Ram Mandir: गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याकडून अयोध्येतल्या राममंदिरासाठी मोठी भेट; प्रभू श्रीरामाच्या मूर्तीसाठी दिला तब्बल ११ कोटींचा मुकुट

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीला अयोध्येत मोठ्या उत्साहात राम मंदिराचे उद्घाटन झाले. यानिमित्त जगभरातील भाविकांनी आपआपल्या शहरांत जल्लोष केला. काही भाविकांना राम मंदिरासाठी वेगवेगळ्या वस्तू दान केल्या आहेत.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSaam Tv

Surat Diamond Trader Donate 11 Crore Crown For Ram Mandir Ayodhya:

२२ जानेवारीला अयोध्येत मोठ्या उत्साहात राम मंदिराचे उद्घाटन झाले. यानिमित्त जगभरातील भाविकांनी आपआपल्या शहरांत जल्लोष केला. काही भाविकांना राम मंदिरासाठी वेगवेगळ्या वस्तू दान केल्या आहेत. सुरतमधील एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याने अयोध्येतील रामल्लाच्या मूर्तीसाठी तब्बल ११ कोटी रुपयांचा मुकुट दिला आहे. (Latest News)

११ कोटींचा मुकूट प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसाठी तयार केला आहे. सुरतमधीस ग्रीन लॅब कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी हा मुकूट दिला आहे. हा मुकुट सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी बनवलेला आहे. हा मुकुट सहा किलोग्रॅम वजनाचा आहे. मुकेश पटेल यांनी त्यांच्या कुटुंबासह मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना हा मुकुट दिला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात त्यांनी हा मुकूट सूपूर्त केला आहे.

Ayodhya Ram Mandir
Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; भाजप किती जागा जिंकणार?, गुरु रामभद्राचार्यांच्या भविष्यवाणीची देशभर चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश पटेल यांनी मूर्तीसाठी काही दागिनेदेखील दिले आहेत. मुकेश यांनी त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना रामाच्या मूर्तीचे मोजमाप करण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर या मापानुसार मुकुट तयार केला आहे. या मुकुटात ४ किलोग्रॅम सोने, हिरे, माणिक, मोती आणि विविध आकाराचे नीलम लावण्यात आले आहे.

२२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या समारंभाला देशभरातील अनेक दिग्गज नेते, सेलिब्रिटी उपस्थित होते. देशभरात नागरिकांनी जल्लोष साजरा केला होता.

Ayodhya Ram Mandir
Republic Day 2024: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ आहे विशेष, 'असा' आहे देखावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com