...म्हणून शिवसेना नेते भास्कर जाधव निशाण्यावर, का होतोय जाधवांना विरोध? वाचा सविस्तर रिपोर्ट

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, पण...
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Saam TV

जितेश कोळी

मुंबई : कोकणातील शिवसेनेचे नेते व गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांना गेल्या काही दिवसांपासून भाजपासह शिंदे गटाकडून सतत टार्गेट केलं जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही जाधव यांच्यावर जहरी टीका केली. भास्कर जाधव हे ठाकरेंची आयटम गर्ल आहेत, असं खळबळजनक विधान लाड यांनी आज केल्यामुळं राजकीय वातावरण तापलं. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर भास्कर जाधव यांनाच का टार्गेट केलं जातंय? याबाबत साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट वाचा. (Bhaskar Jadhav latest News Update)

Bhaskar Jadhav
Dhananjay Munde : शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा; अन्यथा रस्त्यावर उतरू, धनंजय मुंडेंचा इशारा

कोकण हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.पण याच बालेकिल्ल्यात गेल्या काही वर्षांमध्ये खिंडार पडायला सुरुवात झालीय.माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले आमदार उदय सामंत आणि शिवसेनेची तोफ समजले जाणारे शिवसेना नेते रामदास कदम व त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांचा शिंदे गटात झालेला सहभाग,हे सर्व लक्षात घेता सिंधुदुर्ग पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यात देखील शिवसेनेला कोणीच वाली शिल्लक राहिलेला नाही.

Bhaskar Jadhav
Government Job : आरोग्य विभागात मोठी भरती, १० हजार तरुणांना सरकारी नोकरीची संधी, पाहा संपूर्ण वेळापत्रक

पण अशा परिस्थितीत राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतलेले आमदार भास्कर जाधव यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही.उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त भास्कर जाधव यांनी आपल्या आक्रमक शैलीतून विरोधकांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली.आपल्या प्रत्येक भाषणातून,प्रत्येक सभेतून त्यांनी सत्तांतराच्या नाट्यावर बेधडक टीका केली.या टीकेचे पडसाद म्हणूनच आज आमदार भास्कर जाधव यांना टार्गेट केले जात असल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.

कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते रामदास कदम हेच शिंदे गटात सहभागी झाल्याने कोकणात ठाकरे गटाच्या शिवसेनेत आमदार भास्कर जाधव हे एकमेव आक्रमक नेते शिल्लक राहिले होते.भाजपा सह शिंदे गटावर बेधडक टीका करण्यात आमदार भास्कर जाधव यांनी सुरुवातीपासून पुढाकार घेतला.कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला आमदार भास्कर जाधव यांच्या रुपात एक आक्रमक नेता आता मिळाला आहे. कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला कमकुवत करायचा असेल, तर आमदार भास्कर जाधव यानांच टार्गेट करावे लागेल हे समीकरण स्पष्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com