निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच संजय राऊतांचा गंभीर आरोप, सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटल्याचा दावा, पुरावेही देणार

Sanjay Raut on Maharashtra Assembly Election : राज्यात आज विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वीच संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय.
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv
Published On

Maharashtra Assembly Election Date : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात आज निवडणुका जाहीर होणार आहेत, त्याआधीच शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत यांनी महायुती सरकारवर पैसे वाटण्याचा गंभीर आरोप केला आहे. सत्ताधारी पक्षाने कालरात्रीपर्यंत आमदारांना पैशाचे वाटप केले, असे संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील निवडणुका एका टप्प्यात व्हायला हरकत नाही. सगळ्यांना पैसे पोहोचले आहेत, असा टोलाही यावेळी राऊतांनी लगवला.

Sanjay Raut
Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीची आज होणार घोषणा; निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद

संजय राऊतांचा गंभीर आरोप -

सत्ताधारी पक्ष आपल्या आमदारांना काल रात्रीपर्यंत पैशाचं वाटप केलं आहे. 10 ते 15 कोटी मतदारसंघात पोहोचल्याची माहिती माझ्याकडे आहे. ही माहिती मी निवडणूक आयोगाला देत आहे. त्याच काय करायचं ते त्यांनी पहावं. निवडणूक आयोगाला पत्र लिहून काही फायदा होईल का ? आम्ही लोकांच्या माध्यमातून त्यांना सांगणार आहोत. अमोल किर्तीकरबाबत पत्र लिहिलं, कोर्टात गेलो काही झाल नाही. पुरावे दिले तरी काहीच झालं नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिकमधे हेलिकॉप्टरमधे पैशांच्या बॅग उतरवल्या त्याचा व्हिडिओ दिला तरी आयोगाने काही कारवाई केली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Maharashtra Assembly Election Date : आजपासून राज्यात आचारसंहिता, प्रचाराचा धुराळा, सध्या कुणाची ताकद किती?

निवडणुका निष्पक्ष घ्याव्यात -

राज्यातील निवडणुकीची सर्वजण प्रतीक्षा करत होते. निवडणुका निष्पक्ष घ्याव्यात ही इच्छा आहे. सत्ताधाऱ्यांनी त्रास देऊ नये. पैसे आणि यंत्रणेचा त्रास रोखण्यासाठी आयोगाने जागरूक राहाव ही आमची माफक अपेक्षा आहे.

जागावाटपावर काय म्हणाले?

जागावाटप जाहीर होईल. 210 पेक्षा जास्त जागांवर आमचं एकमत झालं आहे. राहिलेली जागांवर उद्याच्या दिवसात निर्णय घेऊन मोकळे होऊ..मुख्यमंत्री पदासाठी लढू नका महविकास आघाडीसाठी लढा अशा सूचना काँग्रेस नेत्यांनी केल्याच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करत आहोत. काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदाचा महाराष्ट्राला मान्य असेल, असा चेहरा असेल तर त्यांनी तो जाहीर केला तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ.आमच्यकडे एकच चेहरा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीकडे देखील चेहरा असू शकतो, असे राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com