Maharashtra Assembly Election Date : आजपासून राज्यात आचारसंहिता, प्रचाराचा धुराळा, सध्या कुणाची ताकद किती?

Maharashtra Assembly Election News : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.
Vidhan Parishad Election Resul
Maharashtra Assembly Election Date Saam Digital
Published On

Maharashtra Assembly Election Date 2024 : महाराष्ट्रात आजपासून राजकीय धुराळा उडणार आहे. निवडणूक आयोग (Election Commission of India) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. २८८ विधानसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी साडेतीन वाजता घोषणा करण्यात येणार आहे. राज्यात महायुती आणि मविआ (mahayuti vs mva) यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. लोकसभेला मविआने महायुतीला जोरदार धक्का दिला होता. पण लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलेलं दिसत आहे. लाडकी बहीण योजना, टोलमाफी यासारख्या निर्णायाचा महायुतीला फायदा होईल, असे म्हटले जातेय. राज्यात २८८ जागांवर सध्या महायुतीचं प्राबल्य आहे, पण लोकसभेतील निकालानंतर मविआची ताकदही वाढली आहे. त्यामुळे लढत चुरशीची होईल, असा अंदाज आहे.

महायुती आणि मविआमध्ये जागावाटपचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा केला जातोय, पण अद्याप शंभर टक्के जागावाटप झाल्याचं दिसत नाही. त्यांच्यातील तिढा दिल्लीच्या दरबारी पोहचलाय.

Vidhan Parishad Election Resul
Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीची आज होणार घोषणा; निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद

महायुतीमध्ये कोण किती जागांवर लढणार? mahayuti seat-sharing formula in maharashtra

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १२६, शिंदे गट ९० आणि अजित पवार गट ७२ जागांवर लढण्याची शक्यता आहे.

मविआत काँग्रेसला सर्वाधिक जागा ?

मिळालेल्या माहितीनुसार, मविआमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर ठाकरे आणि शरद पवार यांनाही सन्मानजनक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस ११०, ठाकरे ९० ते १०० आणि शरद पवार ८० ते ८५ जागा लढवण्याची शक्यता सूत्रांनी सांगितली आहे. पुढील आठवड्यात जागावाटपाबाबत अधिकृत माहिती समोर येईल.

Vidhan Parishad Election Resul
Governor Appointed MLC : चित्रा वाघ, पंकज भुजबळ आज आमदारकीची शपथ घेणार, ७ आमदाराविरोधात ठाकरे गट कोर्टात जाणार

विधानसभेच्या एकूण जागा २८८

महायुतीकडे सध्या १८७ जागा

भाजप - १०५

शिवसेना (एकनाथ शिंदे) - शिंदे ४०

राष्ट्रवादी (अजित पवार) -४२

महाविकास आघाडी ७२ जागा -

काँग्रेस - ४४

शिवसेना ठाकरे गट - १६

राष्ट्रवादी शरद पवार - १२

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com