चित्रा वाघ
चित्रा वाघSaam Tv

Governor Appointed MLC : चित्रा वाघ, पंकज भुजबळ आज आमदारकीची शपथ घेणार, ७ आमदाराविरोधात ठाकरे गट कोर्टात जाणार

Governor Appointed MLC : राज्यपाल नियुक्त सात आमदाराला रमेश बैस यांनी मंजूरी दिली आहे. आज दुपारी त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
Published on

Governor Appointed MLC : राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून महा युतीकडून सात जणांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सात नावांची शिफारस राज्यपालांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुतीकडून आलेल्या सात नावांना राज्यपाल रमेश बैस यांनी मंजूरी दिली असून राज्य सरकारला तसा निरोप दिलाय. महाराष्ट्र शासनाकडून याबाबतचे अधिकृत राजपत्र जारी करण्यात आलं आहे. पण ठाकरेंकडून या यादीला विरोध करण्यात आला आहे.

कोणत्या सात उमेदवारांची वर्णी -

एकूण १२ सदस्य नियुक्त करण्यात येणार होते. पण महा युतीकडून सात जणांची शिफारस करण्यात आली आहे, पाच जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. भाजप ३, शिवसेना २ आणि राष्ट्रवादी २ अशा सात जणांची वर्णी लागली आहे.

भाजपाकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंह महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदेसेनेकडून हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांची वर्णी लागली आहे. अजित पवार यांनी पंकज भुजबळ आणि इंद्रिस नायकवडी यांना आमदारकी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजता ७ आमदारांचा शपथविधी होणार आहे. विधीमंडळतात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे.

चित्रा वाघ
शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीला लागला ब्रेक

ठाकरेंची कोर्टात धाव -

महायुतीच्या राज्यपाल नियुक्त जागा नियुक्त केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाकरेंनी पुन्हा एकदा कोर्टाचे दार ठोठावण्याची तयारी केली आहे. 12 पैकी महायुतीतील 7 जणांची नाव निश्चित केल्यानंतर ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आलाय. सोमवारी 7 ऑक्टोबरला सदर याचिकाचे युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर अजूनही निकाल बाकी आहे. या याचिकेचा निर्णय राखीव असताना आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय प्रलंबित असताना त्या विषयावर निर्णय घेणे उचित होणार नाही, असं ठाकरे गटाच म्हणणं आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी जर ह्या नावांवर मान्यता दिली तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गट उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com