शेतात कांद्याचं पीक, पांढरी अन् गुलाबी फुलं येताच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचं बिंग फुटलं; पोलिसांनी धाड टाकली, दृश्य बघून चक्रावले!

Pink And White Flowers Expose Drug Racket In Onion Crop: धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात ठाकरे गटाच्या उपतालुकाप्रमुखाच्या शेतात कांद्याच्या आंतरपिकात अफूची लागवड उघडकीस आली.
Police officers inspect poppy plants seized from an onion farm in Washi taluka of Dharashiv district.
Police officers inspect poppy plants seized from an onion farm in Washi taluka of Dharashiv district.Saam Tv
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिव: ठाकरे गटाचा वाशी उपतालुकाप्रमुख समाधान उघडे याच्या शेतातून तब्बल 485 किलोची अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत. धारशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये असलेल्या दशमेगाव शिवारात या उघडेने त्याच्या शेतात अफूची लागवड केली आहे, अशी गोपनीय माहिती एका खबऱ्याने पोलिसांना दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने धाड टाकली. शेतात अफूची झाडे आढळली. बाजारभावानुसार या झाडांची किंमत 73 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली.

Police officers inspect poppy plants seized from an onion farm in Washi taluka of Dharashiv district.
MSRTC : एसटीचा सवलतीचा प्रवास बदलला; महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागणार, सरकारचा प्लान काय?

समाधान उघडे याने शेतात कांद्याच्या पिकाची लागवड केली होती. त्याच ठिकाणी अफूची लागवडही केली होती. त्यांना गुलाबी आणि पांढरी फुले आलेली दिसली. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी दशमेगाव गाठले. शेतावर धाड टाकली असता, कांद्याच्या पिकासह अफुची लागवड केल्याचं दिसून आलं. अफूच्या झाडांना पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले आली होती. हे शेत ठाकरे गटाचा उपतालुकाप्रमुख समाधान मनोहर उघडे याचे असून, त्यानेच अफुची लागवड केली असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.

Police officers inspect poppy plants seized from an onion farm in Washi taluka of Dharashiv district.
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू, परभणीत हळहळ

त्यानंतर धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या शेतातून एकूण ४८५.६५ किलो वजनाची पांढरी गुलाबी रंगाची फुले तसेच मोठी बोंडे असलेली अफूची झाडे जप्त केली. यावेळी पोलिसांच्या पथकासोबत नायब तहसीलदार किसन सांगळे देखील होते.

आरोपी फरार

पोलिसांनी शेतावर धाड टाकून अफुची झाडं जप्त केल्याचे आरोपी समाधान उघडे याला समजले. अटकेच्या भीतीनं समाधान फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यासाठी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. आरोपी समाधान उघडे हा ठाकरे गटाचा उपतालुकाप्रमुख आहे. त्यानंच अफुची शेती केल्याचं उघड झाल्यानं स्थानिक राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com