पितृपक्ष संपताच राजकीय भूंकप? ठाकरे गटाला मोठा हादरा? शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Shiv Sena Shinde Faction Leader: पितृपक्षानंतर मोठा राजकीय खुलासा होणार, शितल म्हात्रेंचं विधान. राजकीय वर्तुळात खळबळ.
uddhav thackeray News
uddhav thackeray Saam tv
Published On
Summary
  • पितृपक्ष संपताच मोठा राजकीय खुलासा होणार.

  • शितल म्हात्रेंचं विधान चर्चेत.

  • ठाकरे बंधूंच्या युतीवरही वक्तव्य.

अवघ्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती तसेच महाआघाडीनं मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी मोठं विधानं केलंय.

शितल म्हात्रे यांनी मोठा दावा केला आहे. 'आज दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आमची महत्वाची बैठक पार पडली. सध्या पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्ष संपताच मोठा गौप्यस्फोट अन् धक्के दिले जाईल', असा दावा म्हात्रे यांनी केला आहे. शितल म्हात्रे यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

uddhav thackeray News
मृत्यूनंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांसाठी होता खास मेसेज, नेटकऱ्यांचे डोळे पाणावले

ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शितल म्हात्रे म्हणाल्या, 'राज ठाकरे युतीबाबत एक शब्दही काढत नाहीयेत. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दिघे साहेबांबाबत संजय राऊत हे जे काही बोलत आहेत, त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं त्याकडे गांभीर्यानं पाहत नाही', असं म्हात्रे म्हणाले.

uddhav thackeray News
कृषीमंत्र्यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला; काळे झेंडे दाखवत निषेध, नेमकं कारण काय?

ज्यांनी कफन आणि खिचडीतून पैसे खाल्ले आहेत. त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही म्हात्रे यांनी लगावला आहे.

uddhav thackeray News
डॉक्टरच्या बायकोला जाळ्यात अडकवलं; प्रायव्हेट व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, लाखो पैसे लुबाडले, अखेर..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com