Konkan Politics : व्याजासकट परतफेड करणार; उद्धव ठाकरेंना कटकारस्थानी म्हणत रामदास कदमांचा गंभीर आरोप

Uddhav Thackeray Vs Ramdas Kadam : रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत टीका केली आहे.
Uddhav Thackeray Vs Ramdas Kadam
Uddhav Thackeray Vs Ramdas KadamSAAM TV
Published On

जितेश कोळी

Uddhav Thackeray Vs Ramdas Kadam : कोकणात खेड येथे ५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेची व्याजासकट परतफेट करणार असल्याचा इशारा कदम यांनी दिला.

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कोकणात खेड येथे पुढच्या महिन्यात ५ तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेआधीच कोकणातील राजकारण तापलं आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Vs Ramdas Kadam
Maharashtra Politics : आम्ही शत्रू नाहीच; आदित्य ठाकरेंच्या मैत्रीच्या सूरांनंतर फडणवीसांनीही आळवला 'राग'

उद्धव ठाकरे यांच्या सभेची व्याजासकट परतफेड करणार आहे, असा इशारा कदम यांनी दिला. शिवसेनेत मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम यांना संपवण्याचे कटकारस्थान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कोकणी जनता चांगली ओळखून आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील जाहीर सभेचा तसूभरही परिणाम होणार नाही, असं रामदास कदम म्हणाले.

Uddhav Thackeray Vs Ramdas Kadam
Uddhav Thackeray News: ठाकरे गट नवीन विधीमंडळ कार्यालयाची मागणी करणार, नियम काय सांगतो?

जे माजी आमदार संजय कदम आता उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत, त्यांचा राजकीय बाप मी आहे हे विसरू नका, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेतील, त्याच ठिकाणी १९ मार्च रोजी माझी जाहीर सभा होईल आणि याच सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असा इशाराही रामदास कदम यांनी यावेळी दिला.

भास्कर जाधव यांच्यावर निशाणा, तुम्ही कुठपर्यंत गेले होते ते...

रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावरही तोफ डागली. ४० आमदारांनी पाप केले म्हणणारे भास्कर जाधव त्यावेळी कुठपर्यंत गेले होते हे आम्हाला माहिती आहे. आमचे ४० आमदार हे निष्ठावंत आणि स्वाभिमानी आहेत, असा पलटवार कदम यांनी केला.

तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीवर बसण्याचे पाप हे उद्धव ठाकरे यांनी केले आहे. भाजप-शिवसेना युतीमधून सर्व आमदार निवडून आले असताना उद्धव ठाकरेंनी फक्त मुख्यमंत्रिपदासाठी लाचारी केली, असा आरोपही कदम यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com