Uddhav Thackeray News: ठाकरे गट नवीन विधीमंडळ कार्यालयाची मागणी करणार, नियम काय सांगतो?

मुंबईत देखील नवीन विधीमंडळ पक्ष कार्यालयाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर संसदेतील आणि विधीमंडळातील कार्यालय गमावण्याची नामुष्की  उद्धव ठाकरे  गटावर आली आहे. आता संसदेत आणि विधीमंडळ दोन्हीकडे ठाकरे गटाचे कार्यालयच नाही. म्हणून ठाकरे गट नवीन विधीमंडळ कार्यालयाची मागणी करणार आहे.

नियमानुसार, संसदेत कार्यालयाची मागणी करण्यासाठी ८ खासदारांची आवश्यकता आहे. ठाकरे गटाकडे संसदेत एकूण ८ खासदार आहेत. मुंबईत देखील नवीन विधीमंडळ पक्ष कार्यालयाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: काँग्रेस-राष्ट्रवादीही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? ठाकरे गटाची बार्गेंनिंग पॉवर कमी होणार?

राज्यात 27 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची पहिल्याच दिवशी विधानभवनात बैठक पार पडणार आहे. ही बैठक विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात पार पडणार आहे.

Uddhav Thackeray
Kapil Sibbal in SC: 'केस जिंकणे किंवा हारणे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही...', असं म्हणत कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद संपवला

ठाकरे गटाकडे विधिमंडळ कार्यालय नसल्याने ठाकरे गटाचे आमदार विधानपरिषद विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयात बसणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवनात हजेरी लावणार आहेत. २ मार्चला महाविकास आघाडीची बजेटवर बैठक विधानभवनात होणार आहे, या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com