>>सुशील थोरात
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांबाबत मोठे विधान केले होते. आमच्यात राजकीय विरोध असू शकतो पण आम्ही अजूनही त्यांना मित्र मानतो, तुम्ही त्यांना विचारा ते आम्हाला काय समजतात? असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे आणि आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाही. मात्र अलीकडच्या काळात शत्रुत्व पाहायला मिळत आहे, ते बरोबर नाही. महाराष्ट्राची तशी परंपरा नाही असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही नेत्यांच्या या वक्तव्यांनंतर ठाकरे-फडणवीस यांच्यात निर्माण झालेला दुरावा आता कमी होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Latest Marathi News)
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले...?
एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू अजिबात नाही. महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. अलिकडच्या काळात एक शत्रूत्त्वाची भावना पहायला मिळते. पण, ती आपल्याला संपवावी लागेल. उद्धवजी आणि आदित्य यांनी वेगळा राजकीय मार्ग पत्करला, आमचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे आम्ही शत्रू नाही, तर वैचारिक विरोधक आहोत, असे फडणवीस म्हणाले.
'राऊतांना माझी क्षमता माहित आहे'
शिवसेना फोडण्यात भाजपच्या देवेंद्र फडवणीस यांचा हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर उत्तर देताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की, संजय राऊत यांना माझी क्षमता जास्त आहे असे कळून चुकले आहे. त्यांना माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. (Latest Political News)
'राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरच नाही'
अलीकडच्या काळात संजय राऊत जे बोलताय ते फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांनी बोलताना काही संयम बाळगला पाहिजे आणि वस्तुस्थिती पाहून बोलले पाहिजे. किमान लोकांना खरं वाटेल असं बोललं पाहिजे अशी अपेक्षा आहे. मात्र शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे, असे फडणवीस म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.