

शिवसेना नेते अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला.
गळाभेटीच्या बहाण्याने आरोपीने चाकूने वार केला.
गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू.
छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.शहरातील बाबा पेट्रोलपंप चौक परिसरात गळाभेटीच्या बहाण्याने आरोपीने त्यांना जवळ बोलावलं आणि त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
शिवसेना नेत्यावर हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. आरोपी राम बोडखे याने अंबादास म्हस्के यांना रविवारी रात्री फोन करून भेटण्यासाठी बोलावले होत त्यानंतर बाबा पेट्रोलपंप चौकात भेट झाल्यानंतर “मजाक करत होतो” असे म्हणत आरोपीने गळाभेट घेतली आणि अचानक चाकूने गळ्यावर वार केला. तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.
गंभीर जखमी अवस्थेत म्हस्के यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . दरम्यान आरोपी राम बोडखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत . अंबादास मस्के यांच्यावर हल्ला झाल्या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
शिवसेना नेत्यावर हल्ला झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथेही घडली. अर्णी नगरपरिषदेमध्ये हा हल्ल्याची घटना घडली. किरकोळ कारणावरून शिंदे गट शिवसेना नगरसेवकावर पालिका इमारतीतच लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात नगरसेवक गंभीर जखमी झाले असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पवन चाफले असे मारहाण झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे नगरसेवक पवन चाफले हे आर्णी पालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये बसलेले होते. तेव्हा दोन जण अचानक केबिनमध्ये घुसले आणि त्यांनी केवळ शुल्लक कारणावरून नगरसेवक चाफले यांना लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पवन चाफले यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.