Teacher Dies : हळहळ! जनगणनेची माहिती घेतानाच शिक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू

sangola teacher dies during census duty : जनगणनेच्या कर्तव्यावर असताना शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनं सांगोला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जनगणनेच्या कर्तव्यावर असताना शिक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू
सांगोल्यात जनगणनेच्या कर्तव्यावर असताना शिक्षक राजाराम ढोले यांचा मृत्यू झाला. saam tv
Published On
Summary
  • जनगणनेचे काम करताना हार्ट अटॅकने शिक्षकाचा मृत्यू

  • सांगोल्यातील गावडे वस्ती परिसरातील घटना

  • सांगोल्यात विद्यामंदिर प्रशालेत सहशिक्षक होते

  • जनगणना प्रगणक म्हणून होते नियुक्तीवर

जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना सांगोल्यातील राजाराम दामोदर ढोले (वय ४९) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सांगोल्यातील विद्यामंदिर प्रशालेत ते सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. राजाराम ढोले यांची जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

ढोले हे सोमवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरालगतच्या गावडे वस्ती परिसरात जनगणनेअंतर्गत माहिती संकलनाचे काम करत होते. त्याचवेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

जनगणना प्रगणक म्हणून झाली होती नियुक्ती

राजाराम ढोले हे सांगोल्यातील विद्यामंदिर प्रशालेत सहशिक्षक होते. सध्या जनगणना सुरू असून, ढोले यांनी जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती झाली होती. ते जनगणनेच्या ड्युटीवर होते. घरोघरी जाऊन माहिती गोळा करत असतानाच, त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जनगणनेच्या कर्तव्यावर असताना शिक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू
Crime News: लग्नाच्या तीन महिन्यांत नव्या नवरीची गर्लफ्रेंडच्या घरात पतीने केली हत्या; मृतदेह बाथरूममध्ये लपवून दोघेही फरार

माहिती संकलनावेळीच अस्वस्थ वाटू लागले अन्...

राजाराम ढोले हे जनगणनेच्या कर्तव्यासाठी सांगोला शहराजवळच्या गावडे वस्ती परिसरात गेले होते. सोमवारी सकाळी साधारण पावणे दहाची वेळ होती. गावडे वस्तीवर जनगणनेअंतर्गत माहिती संकलन करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी ढोले यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागले. काही वेळानं त्यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

जनगणनेच्या कर्तव्यावर असताना शिक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू
Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com