ZP निवडणुकीनंतर शिंदे सेना अ‍ॅक्शन मोडवर; रायगडमधील शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Raigad Politics: जिल्हा परिषद निवडणुकांनंतर, शिंदे सेनेने पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी रायगडमधील एका प्रमुख नेत्याला पक्षातून काढून टाकले आहे. शिवसेनेच्या या कारवाईमुळे कोकणासह राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Deputy Chief Minister Eknath Shinde
Shinde Sena takes strict action, expels key Raigad leader after ZP election fallout.Saam Tv News
Published On
Summary
  • जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिंदे सेना अॅक्शन मोडवर

  • रायगडमधील शिवसेनेच्या नेत्याची हकालपट्टी

  • पक्षविरोधी कारवायांवर कडक कारवाई

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर शिवसेना अॅक्शन मोडवर आली आहे. शिवसेना पक्ष बांधणीच्या कामाला लागली आहे. पार्श्वभूमीवर रायगडमध्ये मोठी उलटफेर होत आहे. रायगडमध्ये महायुतीची सत्ता आली असेल तरी सत्तेत बसण्यासाठी शिवसेनेला खूपच नवस करावा लागला. पक्षातील अकार्यक्षम आणि पक्षविरोधी कारवाया झाल्याने शिवसेनेला सत्ता मिळवून दुरापास्त झालं होतं.

त्यामुळे आता पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास पक्षाने सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रायगडमधील शिवसेनेचे प्रमुख नेत्याची हाकलपट्टी करण्यात आली आहे. यामुळे कोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी धडक कारवाई केली आहे.

रोहा तालुक्यातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी पक्षातील अकार्यक्षम आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात पक्षाने व्यापक कारवाईला सुरूवात केली आहे. तसेच रोहा तालुका कार्यकारिणी विसर्जित करण्यात येत असल्याचं जाहीर केले आहे. तर याच बैठकीत पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मनोज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्याच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेण्यात आला आहे. या कारवाईनंतर कोकणासह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde
विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार

रोहा नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची भाजपसोबत युती झाली होती. मात्र तेथे शिवसेनेला तेथे चांगली कामगिरी करता आली नाही. तर पक्षाच्या उमेदवारांना मदत न करता पक्षातील अनेकांनी विरोधकांशी संगम मत केलं. याचीच पुनरावृत्ती जिल्हा परिषद निवडणुकीतही झाली.

Deputy Chief Minister Eknath Shinde
मोठी बातमी! पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा

तर उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले मनोज शिंदे नगरपालिका निवडणुकीपासूनच तटकरेंच्या संपर्कात होते अशी चर्चा होती. यावरूनच आता केणी यांनी संपुर्ण तालुका कार्यकारीणीच विसर्जित करत शिंदे यांच्यासह इतरांना दणका दिला आहे. पक्षात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, अशा नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा या कारवाईतून देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com