वनविभागाच्या जागेत कापूस-तुरीच्या आड गांजाची शेती; पोलिसांचा छापा अन् 82 लाखांचा माल जप्त

Illegal Cannabis Cultivation On Forest Land In Shirpur: शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वनविभागाच्या जमिनीवर कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये सुरू असलेल्या गांजा शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
Shirpur Cannabis Farm Busted
Shirpur Cannabis Farm Bustedsaam tv
Published On

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे: शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या गांजा शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चक्क कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 330 किलो गांजासह सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 82 लाख 50 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

Shirpur Cannabis Farm Busted
पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, लाठ्या-काठ्या अन् विटांनी बेदम मारलं, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

शिरपूर तालुक्यातील चिलारे, पोस्ट सुळे परिसरातील अतिदुर्गम भागात वनविभागाच्या जमिनीवर ही बेकायदेशील गांजा शेती सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. संशयित आरोपी शिलदार पावरा आणि दीपक पावरा यांनी कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये कॅनाबिस वनस्पती म्हणजेच गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचे पोलिसांनी सांगितले. शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.

Shirpur Cannabis Farm Busted
Pune toxic liquor case: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

या कारवाईदरम्यान 42 वर्षीय दीपक पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांची चाहूल लागताच दुसरा संशयित शिलदार पावरा हा घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. दरम्यान घटनास्थळावरून सुमारे 330 किलो वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याची किंमत 25 हजार रुपये प्रति किलो, म्हणजेच एकूण 82 लाख 50 हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.

Shirpur Cannabis Farm Busted
Encounter: अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या, आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या गांजा शेतीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com