काॅंग्रेस उपाध्यक्षांचा राजीनामा; शिर्डीत भरला उमेदवारी अर्ज

शिर्डी नगरपंचायतीचे पालिकेत रुपांतर व्हावे यासाठी दाखल असलेल्या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी हाेणार आहे.
shirdi nagar panchyat election
shirdi nagar panchyat election
Published On

शिर्डी : शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीवर (shirdi nagarpanchayat election update) ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे. यामुळे आजपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दरम्यान आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आता हे दाेन्ही उमेदवार शेवटपर्यंत त्यांचे अर्ज ठेवणार की उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी माघार घेणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह शिर्डीतील जनतेस लागली आहे.

काही दिवसांपूर्वी शिर्डी ग्रामस्थांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. सर्व पक्षाच्या पुढा-यांसमवेत ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय झाला हाेता. त्यास आज अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत पाठींबा मिळाला.

shirdi nagar panchyat election
१०० विद्यार्थी, ११ कर्मचारी काेविड बाधित; आठवड्याची सुटी जाहीर

दरम्यान आज काॅंग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुरेश आरणे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी नगरपंचायत निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अर्ज भरण्यापूर्वी आरणे यांनी काँग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आरणे यांनी अर्ज भरु नये यासाठी मान्यवरांनी त्यांची मनधरणी केली परंतु त्यात यश आले नाही.

शिर्डी नगरपंचायतीचे पालिकेत रुपांतर व्हावे यासाठी दाखल असलेल्या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी हाेणार आहे. कदाचित पालिकेबाबतचा आदेश झाल्यास पुन्हा निवडणुकीस सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या भीतीने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भुमिका घेतली हाेती. आज सुरेश आरणे आणि त्यांच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी दाखल केलेला अर्ज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी तसाच ठेवणार की माघार घेणार हा आता उत्सुकतेचा विषय बनला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com