शेकाप-भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले, तरीही शिंदेसेना जिंकली; विजयाचा झेंडा फडकवत प्रतिष्ठा राखली

Shinde Sena Candidate Swapnali Jadhav Wins Pali Ward 13 By-election: पाली नगरपंचायत प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीत शिंदे सेनेच्या स्वप्नाली जाधव यांचा दणदणीत विजय. भाजप-राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचा पराभव करत 24 मतांनी विजय मिळवला.
Swapnali Jadhav celebrates her victory with Shiv Sena (Shinde faction) leaders and supporters after winning the Ward 13 by-election in Pali, Raigad.
Swapnali Jadhav celebrates her victory with Shiv Sena (Shinde faction) leaders and supporters after winning the Ward 13 by-election in Pali, Raigad.saam tv
Published On

अमित गवळे, प्रतिनिधि

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 13 च्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि हायव्होल्टेज ठरलेल्या पोटनिवडणुकीत अखेर शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या उमेदवार स्वप्नाली विनायक जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) स्थानिक पातळीवर बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, मतदारांनी महायुतीमधील ही बिघाडी धुडकावून लावत शिवसेनेच्या स्वप्नाली जाधव यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे.

Swapnali Jadhav celebrates her victory with Shiv Sena (Shinde faction) leaders and supporters after winning the Ward 13 by-election in Pali, Raigad.
Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत का गेले? बंडखोर खासदाराने सांगितलं कारण...

सोमवारी (ता. 21) पार पडलेल्या मतमोजणीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, प्रभाग 13 मध्ये एकूण 238 मते नोंदवली गेली होती. यामध्ये शिवसेनेच्या स्वप्नाली विनायक जाधव यांना 129 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत शेकापचे उमेदवार सुधीर अनंत साखरले यांना 105 मतांवर समाधान मानावे लागले. स्वप्नाली जाधव यांनी सुधीर साखरले यांचा 24 मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत 'नोटा' पर्यायाला 04 मते पडली.

Swapnali Jadhav celebrates her victory with Shiv Sena (Shinde faction) leaders and supporters after winning the Ward 13 by-election in Pali, Raigad.
Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत का गेले? बंडखोर खासदाराने सांगितलं कारण...

या पोटनिवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली ती महायुतीमधील अंतर्गत फुटीमुळे. स्वप्नाली जाधव यांच्या विजयाची घोषणा होताच पाली शहरात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. घोषणा देत गुलाल उधळत आणि ढोल-ताशांच्या गजरत विजयी मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी स्वप्नाली जाधव यांनी शिवसेना तालुकाध्यक्ष अनुपम कुलकर्णी, रायगड जिल्हा युवक प्रमुख संजय म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख सूरज शेळके व शिवसेना जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत, तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार यांचे आभार मानले. या सर्वांनी स्वप्नाली जाधव यांचे विजयासाठी मेहनत घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com