राजकारण तापलं! शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भिडले; नेमकं काय घडलं?

Shinde Sena and NCP workers clash at Khalapur Tehsil Office: रायगडच्या खालापूर तहसीलदार कार्यालयात एल अँड टी प्रकल्प आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यावरून शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला.
RAIGAD POLITICS HEATS UP: SHINDE SENA AND NCP WORKERS CLASH IN KHALAPUR
RAIGAD POLITICS HEATS UP: SHINDE SENA AND NCP WORKERS CLASH IN KHALAPURsaam tv
Published On: 

सचिन कदम, साम टीव्ही

राज्याच्या राजकारणात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र असली तरी रायगडमध्ये या दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जो वाद आहे तो सर्वश्रुत आहेत. शिंदेसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यात मागच्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. यामुळेच आता कार्यकर्त्यांमध्ये देखील एकमेकांच्या विरोधात खटके पडायला सुरुवात झाली आहे.

RAIGAD POLITICS HEATS UP: SHINDE SENA AND NCP WORKERS CLASH IN KHALAPUR
15 दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर सुनेत्रा पवार...; आमदाराच्या दाव्याने खळबळ

खालापूर तहसीलदार कार्यालयात बैठक सुरू असताना हा प्रकार घडला. खालापूर परिसरात एल अँड टी (L&T) कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पावरून आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यावरून गेल्या महिनाभरापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार महेंद्र थोरवे यांचे बंधू विश्वनाथ थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आणि महसूल प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला. त्यानंतर बैठकीतील वाद मिटवण्यात आला.

RAIGAD POLITICS HEATS UP: SHINDE SENA AND NCP WORKERS CLASH IN KHALAPUR
गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील पॅनलची जोरदार मुसंडी; कार्यकर्त्यांचा जल्लोष|VIDEO

मागच्या अनेक दिवसांपासून कर्जत आणि खालापूर परिसरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वारंवार समोर येत आहे. राज्यात दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर प्रकल्प आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरून कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण होत असल्याचं या घटनेतून दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com