shashikant Shinde vs mahesh shinde Koregaon Vidhan Sabha Exit Poll 2024: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये पुन्हा दोन शिंदेंमध्ये सामना रंगणार आहे. शिंदे गटाने विद्यमान आमदार महेश शिंदेंना पुन्हा संधी दिलीय. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लोकसभेला पराभूत झालेल्या शशिकांत शिंदेंवर विश्वास दाखवलाय. पण मतदारांनी महेश शिंदे यांनाच कौल दिल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतेय.
लोकसभेनंतर विधानसभेतही शशिकांत शिंदे यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोरेगावमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे महेश शिंदे यांचं पारडं जड आहे. लोकसभेला शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून पराभवाचा धक्का बसला होता. आता आमदारकीलाही जबरी धक्का बसण्याची शक्यता आहे. २०१९ च्या विधानसभेला शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता. यावेळीही शशिंकात शिंदे यांना पराभवाचा धक्का बसणार आहे.
कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार महेश शिंदे यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. विधानसभा २०२४ मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 77.64 टक्के मतदान झालं. मतदारांनी महेश शिंदे यांच्या पारड्यात मतं दिल्याचं दिल्याचं दिसतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.