Maharashtra Exit Poll 2024 : चंद्रकांत पाटलांना कोथरुडकर पुन्हा आमदार करणार का? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

kothrud Exit Poll 2024 : चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा आमदार होतील का? याची चर्चा राज्यभरात सुरु आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली.
Exit Poll 2024
Kothrud Vidhansabha Exit Poll 2024Saam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

Chandrakant Patil vs Chandrakant Mokate, Kothrud Vidhansabha Exit Poll 2024 : कोथरुडकरांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनाच कौल दिल्याचं दिसतेय. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, कोथरुडमध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील बाजी मारण्याची शक्यता आहे. कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून चंद्रकात मोकाटे यांचं आव्हान होतं. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील दुसऱ्यांदा आमदार होऊ, शकतात असा अंदाज एक्झिट पोलचा अंदाज आहे.

2009 मध्ये शिवाजीनगर मतदार संघाचे विभाजन झालं आणि कोथरूड मतदार संघ तयार झाला. त्याकाळी एकत्रित असलेल्या शिवसेनेमधून चंद्रकांत मोकाटे हे कोथरूडचे पहिले आमदार ठरले. 2014 मध्ये मात्र कोथरूड चा ताबा भाजपने मिळवला. सध्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पारड्यात कोथरूडकारांनी मतं डागली. 2019 मध्ये विद्यमान आमदारांना डावलून भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. पक्षांतर्गत नाराजी होईल का चंद्रकांत पाटील निवडून येतील का? अशा गोष्टींचा काही परिणाम झाला नाही. चंद्रकांत पाटील हे तब्बल 25 हजार मतांनी 2019 मध्ये निवडून आले. त्यावेळी मनसेचे किशोर शिंदे हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

कोथरूड हा तसा पाहिला गेला तर झपाट्याने विकसित होत असलेला मतदारसंघ. वाढत्या शहरीकरणामुळे या ठिकाणी मूलभूत प्रश्न जर कुठला असेल तर ती म्हणजे वाहतूक कोंडी. रस्ते, पाणी हे काही प्रमाणावर दुय्यम मुद्दे म्हणून लक्षात घेतले जाऊ शकतात. महाविकास आघाडी कडून चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी द्यायला काहीसा उशीर झाला का असा देखील प्रश्न निर्माण झालेला होता. उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची एकही सभा या मतदारसंघात झालेली नाही. दुसऱ्या बाजूला मनसेने यांचा जुना खिलाडी म्हणजेच किशोर शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देत या ठिकाणी थेट राज ठाकरे यांनी सभा घेतली.

मात्र या दोन्ही उमेदवारांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर काही फरक पडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेलच मात्र त्यापूर्वी 2019 ते 2024 या दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी एक मजबूत ताकद आणि मोठा जाळ कोथरूडमध्ये विणलं. अगदी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांपासून ते सामान्य कुटुंबातील व्यक्तींपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी स्वतः हजेरी लावली. मतदारसंघात आणलेल्या निधीचा पुरेपूर वापर सुद्धा काही प्रमाणावर झालेला पाहायला मिळाला. कोथरूड हे भाजप चे सत्ता केंद्र आहे. केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार, लोकसभेचे खासदार तसंच महानगरपालिकेतील सर्वाधिक नगरसेवक याच मतदारसंघातून येतात. त्यामुळे संपूर्ण राज्यात भाजपासाठी कुठला सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जात असावा तर तो म्हणजे कोथरूड विधानसभा मतदारसंघ..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com