Sharad Pawar: शरद पवार मारकडवाडीला भेट देण्यापुर्वी मुख्यमत्र्यांचे झळकले बॅनर; दोन गट आमने सामने येणार?

Sharad Pawar will visit Markadwadi: शरद पवार येण्यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरबाजीमुळे दोन गट आमने सामने येण्याची चर्चा आहे. अशातच दोन गटात वाद होण्याचीही शक्यता आहे.
Sharad pawar
Sharad pawarSaam Tv
Published On

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी मारकडवाडीतल्या गावकऱ्यांची भेट घेणार आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील हेलिकॉप्टरने मारकडवाडी येथे रविवारी पोहचतील. मात्र, शरद पवार येण्यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरबाजीमुळे दोन गट आमने सामने येण्याची चर्चा आहे. काही स्थानिक ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या अभिनंदाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीमुळे गावातील दोन गटात वाद होण्याची चर्चा आहे.

मारकडवाडी सध्या बॅलेट पेपरवर फेर चाचणी मतदान घेण्याच्या मागणीमुळे चर्चेत आहे. ३ डिसेंबर रोजी आमदार उत्तम जानकर यांनी मतदानाची तयारी देखील केली होती. परंतु प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे फेर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर मारकडवाडी हे गाव प्रसिद्धी माध्यमांमध्ये चांगलेच चर्चेत आले. याठिकाणी लवकरच राहुल गांधीसह इंडिया आघाडीचे नेतेही भेट देण्याची शक्यता आहे. अशातच ८ डिसेंबरला शरद पवार आणि जयंत पाटील हेलिकॉप्टरने मारकडवाडीच्या गावकऱ्यांच्या भेटीला येतील.

मात्र, राष्ट्रवादी क्राँग्रसचे नेते येण्यापुर्वी गावात देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकत आहेत. त्यामुळे दोन गट आमने सामने येतील. तसेच गावात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मारकडवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, याच्या निषाधार्थ महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नसल्याचं समोर आलं आहे.

Sharad pawar
Sharad Pawar : सरकारला विरोधक नकोच, आढाव यांचा आरोप; शरद पवारांचा आंदोलनाला पाठिंबा जाहीर

जनतेच्या मनात शंका

मारकडवाडीतील होणाऱ्या बॅलेट पेपर मतदानावर अनेकांनी विरोध दर्शवला. त्यावर 'हे जनतेने दिलेला जनमत आहे, की निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे? असं आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. आदित्य ठाकरे पुढे म्हणतात, 'विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबात जनतेच्या मनातही अनेक प्रश्न आहेत. आम्ही हरलेले उमेदवार नाही. आम्ही फक्त शंका उपस्थित करत आहोत. जनतेच्या मनात ज्या शंका आहेत, त्याचा मान ठेवून आम्ही शपथ घेणार नाही.' मारकडवाडीत गुन्हा नोंदवल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेणार नसल्याचं स्पष्ट झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com