निवडणूक होईपर्यंत कशाला थांबलात! पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर शरद पवारांचा खडा सवाल

Sharad Pawar Reacts to PM Modi’s Appeal : शरद पवार यांनी गोविंद बागेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर प्रश्न उपस्थित केलेत.
निवडणूक होईपर्यंत कशाला थांबलात! पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर शरद पवारांचा खडा सवाल
Published On

पंतप्रधान मोदींनी केलेले आवाहनाचे गांभीर्य ओळखा. मोदी जितक्या गांभीर्यांनी तितक्यात गांभीर्यांने पाहावे, असा म्हणत शरद पवार यांनी आधी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला मात्र त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर सवाल उपस्थित केलेत. पंतप्रधान मोदींनी जनतेला जागृत करण्यासाठी वेळ का घेतला. त्यांनी निवडणुका होईपर्यंत वाट का पाहिली? असा सवाल शरद पवार यांनी केला.

निवडणूक होईपर्यंत कशाला थांबलात! पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर शरद पवारांचा खडा सवाल
Maharashtra Government: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, इंधन बचतीबाबत सरकारी अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश; १९ उपाययोजना जाहीर

मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली पाहिजे. परंतु या बैठकांना स्वत: पंतप्रधान मोदींनी हजर राहिले पाहिजे. याआधी अनेक बैठका झाल्या त्या बैठकांना पंतप्रधान मोदी हजर नव्हते. दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाची नोंद सर्वांनी घ्यावी. परिस्थती गंभीर आहे. मोदींच्या आवाहनानंतर अनेक नेत्यांनी आपल्या ताफ्यात कपात केली आहे. कोणी मोटरसायकलने कोणी बसने, कोणी मेट्रोने प्रवास करत आहेत. मात्र दोन आणि तीन दिवसाच्या कृतीने जनता गांभीर्य घेणार नाही.नेतेमंडळी किती दिवसापर्यंत आवाहनाचे पालन करतील, असा सवालही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

निवडणूक होईपर्यंत कशाला थांबलात! पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर शरद पवारांचा खडा सवाल
अबब! 1-2-3 नव्हे नितीन गडकरींच्या ताफ्यात चक्क 30 ते 40 वाहनं; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला हरताळ

यासह त्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर प्रश्न उपस्थित केलेत. पंतप्रधान मोदींनी निवडणुकींच्या प्रचारादरम्यान जनतेला का जागृत केलं नाही. निवडणुका होईपर्यंत का ते गप्प बसलेत असा सणसणीत सवाल शरद पवार यांनी केला. देशातील परिस्थिती बिकट होऊ नये म्हणून मोदींनी आवाहन केलंय. सर्वांनी सहकार्य करावं.

याआधीही देश अशा परिस्थितीला सामोरे गेले आहे, पण परंतु पंतप्रधान मोदींनी इंधन बचत करण्याच्या आवाहनाला उशीर का केला. असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. दरम्यान देशातील परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे, असं शरद पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com