

दिल्ली : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस चे खासदार सुनील तटकरे सुध्दा उपस्थित होते या बैठकीत कोणकोणत्या विषयांवरती चर्चा केली याची माहिती त्यांनी दिली आहे.Sharad Pawar meets Home Minister Amit Shah
या बैठकीमध्ये आत्ताच राज्यात आलेल्या महापुराच्याMahapur परिस्थितीवरही चर्चा केली असून दरवर्षी सतत येणारा पूरFlood आणी या वर्षीचा पूर आणि अतिवृष्टीमध्ये झालेली वित्त आणि जीवित हानी रोखण्यासाठी पावले उचलण्यात येण्यासंदर्भात तसेच 'एनडीआरएफ'च्या NDRF मदतीचे निकष बदलण्यात यावे अशी विनंती गृहमंत्री अमित शहांना केल्याच तटकरेंनी सांगितल.
हे देखील पाहा-
गृहमंत्रीHomeminister चा प्रतिसाद या बाबत अतिशय सकारात्मक होता तसेच एनडीआरएफ चा बेस कँम्प महाड मध्ये असावा अशी मागणी देखील केली असून राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिली आहे केंद्र सरकार ने तातडीने मंजुरी द्यावी या मागणीवरती सुध्दा गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसादPositive Responce दिला आहे. साखरेच्या किंमतीवरती तसेच इथेनॉलच्याethanol वापरासह इतरही विषयांवर सुद्धा सकारात्मक चर्चा झाली असल्याच तटकरे म्हणाले.
विरोधी पक्षाचे नेते आरडा-ओरडा करत आहेत. पण नुकसानीची व्याप्ती मोठी असल्यामुळे पंचनामा करायला वेळ लागला आणि तो निर्णय योग्यच होता कारण त्यामुळे च नुकसानी ची व्याप्ती कळू शकली पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा एक मोठं पाऊल राज्य सरकार ने उचललं आहे.
'एनडीआरएफ'च्या जुन्या निकषांनुसार मदत मिळाली तर ती अतिशय कमी असेल. या विषयी सुद्धा तातडीने केंद्र सरकार ने पाऊल उचलले पाहिजे शरद पवार साहेब आणि मी तो मुद्दा मांडला आणि गृहमंत्री सुद्धा सकारात्मक आहे आणि लवकरात लवकर पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे असही तटकरे म्हणाले.
Edited By- Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.