दुष्काळी परिस्थिती, बळीराजानं फोडला टाहो; हेक्टरी 50 हजार मदतीची पवारांची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजानं टाहो फोडलाय. तर देशाच्या कृषी क्षेत्राची सूत्रे हाताळलेल्या शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलंय. त्यानंतर लागलीच सरकार अॅक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. शरद पवारांनी नेमकी काय मागणी केलीये?... सरकारनं बळीराजाला काय ग्वाही दिलीये?...
MAHARASHTRA DROUGHT
MAHARASHTRA DROUGHTsaam tv
Published On

शेतकऱ्यांनी कसा टाहो फोडलाय ते....पावसानं पाठ फिरवल्यामुळे हाताच्या फोडासारखं जपलेल्या पिकांचं अक्षरशः होत्याचं नव्हतं झालंय... लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी औसा तालुक्यातील पावसाअभावी वाळून गेलेल्या पिकांची पाहणी केली. उभी पिकं करपून गेल्यानं आता खायचं काय... असा प्रश्न उभा राहिल्यानं शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यासमोरच टाहो फोडलाय.

तर दुसरीकडे, बीडमधल्या शेतकऱ्यानं थेट राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन केलाय.

या शेतकऱ्यानं दुष्काळामुळे उद्भवलेली भीषण परिस्थितीचं कृषीमंत्र्यांना सांगितलीये.

ही परिस्थिती फक्त लातूर, बीड पुरतीच मर्यादित नाहीये. सबंध महाराष्ट्रातील बळीराजाला दुष्काळाच्या झळा बसल्यात.

पावसानं दडी मारल्यानं धाराशिव जिल्हा अक्षरशः कोरडाठाक पडलाय. जिल्ह्यातील 225 लघु आणि मध्यम प्रकल्पांत केवळ आठ टक्के पाणीसाठा उरलाय. एव्हंढच नव्हे तर प्रसिद्ध तेरणा प्रकल्प मृतसाठ्यात गेल्यानं जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलंय..

नांदेड

नांदेडमध्ये मागील दीड महिन्यापासून पावसानं दडी मारल्यानं शेतातील पिके करपली आहेत... सोयाबीनसह पिकं वाळल्यानं शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करतायत... ह्या भीषण संकटामुळे माजी कृषीमंत्री शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीये. शरद पवारांनी पत्रात नेमक्या काय मागण्या केल्यात ते पाहूयात...

शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता दुष्काळ जाहीर करा

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजूर कुटुंबांना 25 हजार रुपये मदत द्या

कर्जमाफीची तातडीनं अंमलबजावणी करून तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करा

तातडीनं कर्जमाफी करा, नियमित कर्जदारांचं अनुदान 50 हजारांवरून 1 लाखावर न्या

1 रुपयांत पीकविमा लागू करा, मागील नुकसानीसाठी जाहीर केलेली हेक्टरी 17 हजारांची मदत तत्काळ द्या

टँकर सुरू करा, चारा छावण्या उभारा आणि पशुधनाचं रक्षण करा

शरद पवारांच्या मागणीनंतर आता NDRFच्या मदतीची वाट न पाहता सरकार मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. राज्यातील शेतकऱ्यांनी आजवर अनेक अस्मानी आणि सुल्तानी संकटांचा नेटानं सामना केलाय. मात्र, आता आलेल्या कोरड्या दुष्काळामुळे तो पार मोडून पडलाय. त्यामुळे नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना पुरेशी मदत करण्याची गरज आहे. मात्र सरकार कधी आणि किती मदत देणार याकडे बळीराजाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com