Sharad Pawar: आम्ही ठरवलंय! शरद पवारांना पुन्हा ईव्हीएमबाबत शंका

Sharad Pawar Press Conference: महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जातेय. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी आकडेवारी सादर करत महायुतीवर हल्लाबोल केलाय.
Sharad Pawar
Sharad Pawar Press Conferencesaam Tv
Published On

विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय व्यक्त केलाय. इतकेच नाही तर शरद पवार स्वत: मारकडवडीला भेट देत तेथील लोकांशी संवाद साधणार आहेत. मारकडवडीतील जुन्या पद्धतीने निवडणूक घ्यावी, अशी मागणी लोकांची आहे. त्यात चुकीचं नसल्याचं शरद पवार म्हणालेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जातेय. शरद पवारांनीही आकडेवारी सादर करत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय. आपण विधानसभेतून काहीशी माहिती घेतली होती. त्यांचं म्हणंण एकच होतं की, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ईव्हीएमची तक्रार नव्हती. मग तुम्ही आताच कशी करता? असला सवाल भाजपकडून केला जातोय. पण यात आमच्या निरीक्षणात असं आलं की, चार निवडणुका झाल्या.

Sharad Pawar
Supriya Sule: सरकार स्थापनेच्या विलंबावरून सुप्रिया सुळेंचा महायुतीला चिमटा, म्हणाल्या..

हरियाणात झाली. आपण स्वत: तेथे गेलो होतो. तिथे भाजपची अवस्था कठिण होती. पण तरीही भाजप सत्तेवर आली. पण त्याचवेळी जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा विजय झाला. तर महाराष्ट्रात भाजपला यश आलं. त्याचवेळी झारखंडला भाजपचा पराभव झाला. म्हणजेच थ छोटी राज्य तिथे आम्ही आणि जिथे मोठी राज्य तिथे भाजपचा विजय होतो, असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
Maharashtra Politics: विधानसभा होताच अजितदादांचा शरद पवारांना धक्का, मोठा नेता घड्याळ बांधण्याच्या तयारीत

मते कमी असूनही विजय कसा?

राज्यात निवडणुका झाल्यावर उत्साहाचं वातावरण असतं. आज महाराष्ट्रमध्ये राज्य सरकार स्थापन झाल्यानंतरही उत्साहाचे वातावरण नाहीये. उगाच आरोप करणं योग्य नाही. माझ्याकडे पुरावा नाही. प्रत्येक राजकीय पक्षांना एकंदरीत मतं किती पडली आणि लोक किती निवडून आले याची आकडेवारी काढली. काँग्रेसला राज्यात ८० लाख मते आहेत. आणि काँग्रेसचे १५ लोक निवडून आले. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना ७९ लाख मते मिळाली. काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडली. तरी त्यांचे ५७ लोक निवडून आले, असं म्हणत शरद पवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.

दरम्यान मारकडवडीला येथील निकालावरही तेथील लोकांना प्रश्न उपस्थित केले होते. तेथील शरद पवार गटाने आक्षेप घेतलाय. ईव्हीएमवर घोळ झाल्यामुळेच असा निकाल लागल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर तेथील कार्यकर्त्यांनी आणि काही ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली मात्र प्रशासनाने त्यास नकार दिला.

त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले, आम्ही ठरवलंय मारकडवडीला जाऊन येऊ लोकांचे म्हणणे ऐकून घेऊ. जुन्या पद्धतीने निवडणूक घ्यावी अशी मागणी लोकांची आहे. आम्ही सर्व एकत्र पुढील निवडणुकींना सामोरे जाणार आहे. पराभवाची चिंता करायची नाही, असं शरद पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com