Supriya Sule: सरकार स्थापनेच्या विलंबावरून सुप्रिया सुळेंचा महायुतीला चिमटा, म्हणाल्या..

Supriya Sule Comment On Mahayuti: पुण्यातील एका पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महायुतीला कोपरखळी मारलीय.
Supriya Sule
Supriya Sule Comment On MahayutiSaam Digital
Published On

सरकार स्थापन करायला एवढा उशीर हे दुर्दैव आहे. सरकार स्थापन करायला दहा दिवस लागले. याच मालही आश्चर्य वाटतं की सरकार स्थापनेला एवढा वेळ का लागला, असं म्हणत सुप्रिया सुळे यांना महायुती सरकारला चिमटा काढला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होत्या.

इंडिआ आघाडीने EVM विरोधात एल्गार उगारलाय. ईव्हीएमविरोधातील लढा आता थेट सुप्रीम कोर्टात लढला जाणार आहे. त्यासंदर्भात माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत महायुतीच्या सरकारवर टीका केली. ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असून त्यासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक झाली. त्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.

Supriya Sule
Sharad Pawar News : EVM विरोधाची धार वाढली, पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार

काँग्रेस पक्ष यावर काम करत आले आहे. तसेच त्याबाबत अनेक लोकांकडून आम्हीं मार्गदर्शन घेणार आहोत. जनतेच्या मनात त्याविषयी अस्वस्थता आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज ऐकणं हे आमचं काम आहे. सोमवारी त्याविषयी निर्णय घेतला जाईल अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिलीय.

Supriya Sule
MVA News: मविआला मोठा धक्का, महत्त्वाचा पक्ष बाहेर, वेगळा गट स्थापन करणार

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महायुतीनं तब्बल 231 जागा जिंकल्या. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला. महायुतीला इतकं बहुमत मिळून ही सत्ता स्थापनेला वेळ लागला होता.

मंत्रिपदावरून महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला होता. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला कोपरखळी मारलीय. सरकार स्थापन करायला एवढा उशीर हे दुर्दैव आहे. १० दिवस लागले सरकार स्थापन करायला. मालही आश्चर्य वाटतं की सरकार स्थापनेला एवढा वेळ का लागला. महाराष्ट्राने बहुमत दिलं असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार मिळायला हवं, असं त्या म्हणाल्या.

मरकटवाडीविषयी काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

मरकटवाडीमध्ये झालेल्या मतदानावेळी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप आहे. त्यावरून मरकटवाडी येथे बॅलेटपेपरवर मतदान घेण्यासाठी शरद पवार गट आग्रही आहे. तेथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचंही ठरवलं होतं. मात्र प्रशासनाने त्याला परवानगी दिली नाही.तसेच निवडणूक आयोगाने त्यावर कारवाईदेखील केलीय. त्यावरून बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगाला एवढीच मागणी आहे की समाजात एवढी आस्वस्थता असेल तर एवढीच मागणी आहे की मागणी मान्य करावी.

जगातील अनेक देश बॅलेटवर शिफ्ट झाले आहेत. निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत. बॅलेटवर या कुठलीही अडचण होणार नाही, जगात बदल होत असेल तर आपण देखिल करायला हवा. तर मतदान घेणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल झाल्या प्रकरणीही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. मरकटवाडीमधील लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत ही दडपशही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com