NCP Sharad Pawar Group : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्रातील माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये गावकऱ्यांनीच ईव्हीएमवर शंका उपस्थित करताना, बॅलटवर मतदान घेण्याची तयारी केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंही ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
यासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची वेळ घेण्यात येणार आहे. त्यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार गट ईव्हीएमविरोधात आक्रमक झाला आहे. विशेषतः पवार गटाचे हडपसर मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी पुनर्मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. निवडणूक आयोगाकडे त्यांनी पैसेही जमा केले आहेत. आता त्यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे. याआधी ईव्हीएमविरोधातील काही याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. तीच खबरदारी घेऊन पूर्ण कायदेशीर बाबींची पूर्तता व्हावी यादृष्टीने सिंघवी यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. त्यानंतरच सुप्रीम कोर्टात नव्याने याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती समजते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.