यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Sharad Pawar Latest Statement On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सत्तेसोबत जाणार नसल्याचं सांगत ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे, त्यांनी विरोधी पक्षात यावं, असं आवाहन शरद पवारांनी केलं.
SHARAD PAWAR ON NCP MERGER
SHARAD PAWAR ON NCP MERGERsaam tv
Published On: 

अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा, त्यामुळं दोन्ही गटांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेलं असतानाच, शरद पवार यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. ज्यांना आमच्यासोबत यायचंय, त्यांनी विरोधी पक्षात आमच्यासोबत यावं, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. पवार यांच्या ठाम भूमिकेमुळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं मानलं जात आहे.

अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या. अजित पवार असताना त्यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका झाल्या होत्या, असं शरद पवार गटाच्या काही नेत्यांकडून सांगितलं गेलं. दोन्ही पक्ष कधीही आणि कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात, अशा चर्चांना पुन्हा बळ मिळालं. त्यात काही दिवसांपूर्वी पार्थ आणि जय पवार हे दोघे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळं विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा डोकं वर काढलं. त्याचवेळी शरद पवारांनी याबाबत ठाम भूमिका मांडली.

तत्पूर्वी, अजित पवार गटाकडून विलीनीकरणाच्या चर्चांना कधीही दुजोरा दिला गेला नाही. अशातच शरद पावर यांच्या खासदारांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांचे पेव फुटले होते. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी देखील चर्चा झाल्याचे सांगत आम्हीही त्या बैठकीला उपस्थित होतो, असे विधान केले होते.

SHARAD PAWAR ON NCP MERGER
Maharashtra Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल,10 नेत्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी

दरम्यानच्या काळात पवार कुटुंबातील विवाह सोहळ्यात देखील पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. यावरून देखील अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर पवार यांनी आतापर्यंत थेट भूमिका किंवा भाष्य केले नव्हते. मात्र, आज पहिल्यांदाच शरद पवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

आमच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. माझ्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसोबत जाणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतो, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली. ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे त्यांनी विरोधी पक्षात आमच्यासोबत यावं, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

SHARAD PAWAR ON NCP MERGER
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचे मोठे पाऊल; २९ ऑगस्टला मुंबईत निर्णय

शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, असे मानले जात आहे. सत्तेत जाण्याऐवजी विरोधी पक्षात राहण्याची भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केल्याने आगामी काळातील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com