Sharad Pawar News : दिल्लीत शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यात ईव्हीएमच्या मुद्द्यावर बैठक; नेमकी काय चर्चा झाली?

Sharad Pawar and arvind kejriwal Meet : दिल्लीत शरद पवार आणि अरविंद केरजीवाल यांच्यामध्ये दिल्लीत ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या चर्चेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं.
 दिल्लीत शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यात ईव्हीएमच्या मुद्यावर बैठक; नेमकी काय चर्चा झाली?
Sharad Pawar NewsSaam tv
Published On

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. तर शरद पवार गटालाही अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर बोट ठेवत थेट निकालावर शंका उपस्थित केली. यावरून आज मंगळवारी शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची चर्चा झाली.

दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी ईव्हीएम संदर्भात बैठक झाली. बैठकीला आप पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, ॲड अभिषेक मनू सिंघवी, यांच्यासह शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे खासदार, पराभूत उमेदवार, कॉंग्रेस पक्षाचे नेते गुरूदास सिंह उपस्थित होते. या बैठकीत सुप्रीम कोर्टात जाण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.

 दिल्लीत शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यात ईव्हीएमच्या मुद्यावर बैठक; नेमकी काय चर्चा झाली?
Maharashtra Politics : ईव्हीएम मुंबईच्या समद्रात बुडवले; ठाकरे गटाचं आंदोलन,VIDEO

ईव्हीएमच्या मुद्यावर चर्चा करताना शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप म्हणाले, 'आमच्याकडे असलेलं पुरावे सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा निर्णय झाला आहे. यादीतील नावे कमी झाली होती. निवडणूक आयोगाला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. निवडणूक आयोगाकडून नाव डिलीट करण्यात आली. महाराष्ट्रात गडबड झाल्याचं अरविंद केजरीवाल यांनीही म्हटलं. अभिषेक मनु सिंघवी यांनी आमचं आणि अरविंद केजरीवाल यांचं म्हणण ऐकलं'.

 दिल्लीत शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यात ईव्हीएमच्या मुद्यावर बैठक; नेमकी काय चर्चा झाली?
Rohit Patil News: '....तर गाठ माझ्याशी', रोहित पाटलांचा संजयकाका पाटील यांना खणखणीत इशारा

'आम्ही शुक्रवारी सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखाल करणार आहोत. याचिकेत ४ मुद्दे आहेत. ईव्हीएम हॅक केलं आहे, हा एक मुद्दा आहे. निवडणूक आयोगाने नाव कमी केल्याचा दुसरा मुद्दा आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत वाढ किंवा कमी करण्यात आली, तोही मुद्दा याचिकेत असणार आहे, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com