Shani Shingnapur Trust Fraud: शनीच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा! अखेर शनिशिंगणापूर देवस्थानचं कार्यालय सील

Shani Shingnapur Trust Corruption: अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट अॅपद्वारे भक्तांची फसवणूक करण्यात आली.
Collector seals Shani Shingnapur Temple Trust office after 100 crore scam allegations
Collector seals Shani Shingnapur Temple Trust office after 100 crore scam allegationsSaam Tv
Published On

अहिल्यानगर: शनिशिंगणापुर येथील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचे अनेक प्रकार समोर आल्याने तेथील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केली होती. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही अशी ग्वाही फडणवीसांनी दिली होती.

Collector seals Shani Shingnapur Temple Trust office after 100 crore scam allegations
Solapur: सांगा कसं जगायचं? सोयाबीनचं पीक पाण्यात, डोळ्यात अश्रूंचा पूर; दुसरीकडे कर्ज वसुलीसाठी बँकेकडून नोटीस

अखेर आज शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत कार्यालय सिल केले. विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर कागदपत्रांची हेराफेरी होत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Collector seals Shani Shingnapur Temple Trust office after 100 crore scam allegations
'ही काय स्टंटबाजी वाटते का?' कारवरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके संतापले; मनोज जरांगेंना सुनावलं

या विश्वस्त मंडळावर अनेक भ्रष्टाचारासह अनेक गंभीर आरोप झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ प्रशासकीय कार्यालय सील करण्याचे आदेश दिले. भ्रष्टाचारसंबंधी महत्वाची कागदपत्रे नष्ट होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती प्रशासनाने दिली.

कार्यालय सील करण्याची वेळी मंडळाचे कार्यकारी मात्र गैरहजर होते. या संपूर्ण कारवाई दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते

Collector seals Shani Shingnapur Temple Trust office after 100 crore scam allegations
Buldhana : बुलढाण्यात आक्रीत घडलं, बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून २ तरुणांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ

आमदार विठ्ठल लंघे यांनी मांडली होती लक्षवेधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या शनि मंदिरातील घोटळ्याबद्दलची लक्षवेधी सूचना तेथील आमदार विठ्ठल लंघे यांनी मांडली होती. या ट्रस्टच्या विश्वस्तनी बनावट अॅप तयार करून लाखो भक्तांकडून त्यावर पूजेच्या नावाखाली देणग्या स्वीकारल्या होत्या. असे तीन ते चार बनावट अॅप बनवले होते आणि त्या प्रत्येक अॅपवर तीन ते चार लाख भाविकांनी पैसे पाठवले.

एकूण घोटाळा 100 कोटींचा असल्याचे ते म्हणाले होते. तर भाजप आमदार सुरेश धस यांनी हा 500 कोटींचा घोटाळा आहे असा गंभीर आरोप केला होता. तर ट्रस्टचे विश्वस्त दर आठवड्याला दहा-दहा कोटींच्या जमिनी घेत आहे असा हल्लाबोल केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com