Shaktipeeth Mahamarg: शक्तीपीठविरोधात शेतकरी आक्रमक, मॅपिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण; काम बंद पाडलं, VIDEO व्हायरल

Kolhapur Shaktipeeth Mahamarg: कोल्हापूर आणि सांगलीमधील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत त्यांनी मॅपिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
Shaktipeeth Mahamarg: शक्तीपीठविरोधात शेतकरी आक्रमक, मॅपिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण; काम बंद पाडलं, VIDEO व्हायरल
Shaktipeeth Mahamarg:Saam Tv news
Published On: 

रणजित माजगावकर, कोल्हापूर

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील म्हसवे गावात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रशासनाकडून महामार्गाच्या मॅपिंगचं काम सुरू करण्यात आलं. मात्र, ही बाब समजताच शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि मॅपिंगला तीव्र विरोध केला. यावेळी शेतकरी आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.

संतप्त शेतकऱ्यांनी मॅपिंगसाठी वापरण्यात आलेल्या मशीन आणि वाहनांचं नुकसान केल्याची माहिती आहे. तसंच मोनार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली. अखेर शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मॅपिंगचं काम थांबवून प्रशासनाच्या पथकाला माघारी फिरावं लागलं. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही मोजणी करू देणार नाही, असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय.

दुसरीकडे सांगलीमध्ये देखील शक्तीपीठ मोजणी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. सांगलीच्या विटा - खानापूर तालुक्यात नेवरी, माहुली या भागात शक्तिपीठ महामार्गाची मोजणी पार पडत आहे. या मोजणीसाठी शासनाकडून जय्यत तयारी केली आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मोजणी करण्यात येणार आहे. तर या मोजणीला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ बाधित शेतकरी, राजू शेट्टी सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून विरोध करणार आहेत. याआधीच पहाटे पासून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेण्यात येत आहे.

तर शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीच्या संशयावरून वाळवा तालुक्यातील कुरळपमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दत्तखडी परिसरात सर्वेक्षणासाठी आलेली गुगल मॅपिंगचे वाहन शेतकऱ्यांनी अडवून ग्रामपंचायतीसमोर आणली. कागदपत्रांची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा या भागात न येण्याची सक्त ताकीद देत गाडी परतवून लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.