Shahapur News
Shahapur NewsSaam tv

Shahapur : आमदाराच्या गावात बस येईना; विद्यार्थ्यांची रोज १० किमीची पायपीट, गावातील विद्यार्थीनी रोखली बस

Shahapur News : शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांचे कोठारे हे गाव असून जर आमदारांच्या गावातील विद्यार्थ्यांचे हे हाल आहेत. तर शहापूर तालुक्यात काय समस्या असतील; असा प्रश्न निर्माण होत आहे
Published on

फैय्याज शेख 
शहापूर
: गाव तिथे रस्ता आणि रस्ता तेथे बस हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद आहे. परंतु शहापूर तालुक्यातील कोठारे गाव आमदारांचे असताना देखील या गावात विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी महामंडळाची बस मिळत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना रोज १० किमीची पायपीट करत यावे लागते. रोजच्या या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी आज धसई गावाच्या चौकात बस रोखली आहे. 

शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांचे कोठारे हे गाव असून जर आमदारांच्या गावातील विद्यार्थ्यांचे हे हाल आहेत. तर शहापूर तालुक्यात काय समस्या असतील; असा प्रश्न निर्माण होत आहे. शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील व आमदारांचा गाव म्हणून ओळखले जाणारे कोठारे गावातील विद्यार्थी दररोज धसई गावातील हायस्कूलमध्ये जाण्यासाठी बसने प्रवास करतात. मात्र शाळा सुटल्यानंतर परतीच्या प्रवासाला बस उपलब्ध नसल्याने यापैकी काही विद्यार्थी १० किलोमीटरचा पायी प्रवास करून घर गाठतात. 

Shahapur News
Buldhana : बस गावात न आणता विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उतरवले; संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर अडविल्या बस

शाळा सुटल्यानंतर बस मिळेना 

कोठारे गावातील विद्यार्थी धसई गावातील कै. किसन बाबा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. सकाळी शाळेत जाण्यासाठी बस मिळत असते. मात्र शाळा सुटल्यानंतर बस उपलब्ध होत नसल्याची समस्या आहे. दररोज शाळेत येण्यासाठी घरून पैसे मिळतातच असे नाही. यामुळे बहुतेक विद्यार्थी जंगलातून पायीच प्रवास करतात. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने बिकट समस्या जाणवणार आहे. 

Shahapur News
Shindkheda Crime : पत्नीच्या अपघाती मृत्यूचा बनाव; पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

पालकांकडून अनेकदा मागणी 

अनेक वेळा विद्यार्थी व पालक यांनी शहापूर बसस्थानकात जावून लेखी देत बसची मागणी केली. मात्र बस उपलब्ध होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी धसई गावात बसच रोखून धरली आहे. जोपर्यंत आम्हाला परतीच्या प्रवासाला बस उपलब्ध करून देत नाही; तोपर्यंत बस सोडणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. यामुळे बस प्रवाशांचा देखील खोळंबा झाला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com