दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या बड्या नेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

beed parli crime : बीडच्या परळीत दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या बड्या नेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Beed News
beed parli crime Saam tv
Published On

बीडच्या परळीत शहरात दिवसाढवळ्या शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला

हल्ल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण

काही काळ मोंढा परिसरात दुकाने बंद

नेत्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या परळी शहरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते शिवाजी शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वरिष्ठ नेते शिवाजी शिंदे हे मोंढा परिसरात त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये पत्नीसोबत असताना काही अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिवाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. शिंदे यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविण्यात आलं. या सर्व प्रकरणाचा परळी संभाजीनगर पोलीस तपास करत आहेत.

Beed News
काँग्रेसला मोठा हादरा; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली, आता शिंदे गटाच्या वाटेवर?

शिवाजी शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर परळीत खळबळ उडाली आहे. शिंदे समर्थकांकडून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या हल्ल्यावर शिवाजी शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी शिंदे म्हणाले, 'सुरवसे नावाचा मुलगा आहे. त्याची माझी ओळख देखील नाही. मात्र, त्याचा आणि माझ्या मुलाचा काहीतरी वाद झाल्याचे समजले. तो काल रात्री माझ्या गावी घरासमोर आला. त्यानंतर सर्व गावासमोर मला आणि माझ्या मुलाला अश्लील शिवीगाळ केली. मी त्याची रात्री समजूत काढून परत पाठवून दिले'.

'दुसऱ्या दिवशी सकाळी परळी शहरातील मोंढा परिसरातील माझ्या हॉटेल रिद्धी सिद्धी या ठिकाणी दुपारी पत्नीसोबत होतो. त्यावेळी तो मुलगा आणि त्याचे इतर काही सहकारी माझ्या हॉटेलवर येऊन कोयत्याने हल्ला गेला. त्याने माझ्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात माझ्या हाताते बोटे निकामी झाले, असे त्यांनी सांगितले.

Beed News
Kalyan Politics: दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले; ठाकरे गटाचा भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल

'माझ्या हाता पायावरही अनेक वार केले आहेत. त्याचासोबत इतर तिघेजण होते. एवढेच नाही तर माझ्यासोबत असलेल्या माझ्या पत्नीला मारहाण केली. माझ्या हॉटेलमधील काही पैसे लुटले. त्या हल्लेखोरांचा माझी हत्या करण्याचा प्रयत्न होता की लुटण्याचा प्रयत्न होता हे मला काही समजले नाही, असे पीडित शिवसेना नेते शिवाजी शिंदे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com